बॉलीवूडमध्ये दोन अभिनेते एकमेकांचे चांगले मित्र होऊ शकतात, पण दोन अभिनेत्री मात्र एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होऊ शकत नाहीत. अर्थात दोन अभिनेत्री एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी असण्याची काही उदाहरणे आहेतही, पण अभिनेत्यांच्या तुलनेत ती कमीच आहेत. ‘ब्रदर्स’, ‘मर्डर-२’ चित्रपटाद्वारे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अभिनेत्री जॅकलिन फर्नाडिस हिलाही हाच प्रश्न पडला आणि तिने याचे उत्तरही आपल्या पद्धतीप्रमाणे देऊन टाकले. बॉलीवूडच्या अभिनेत्रींमध्ये असुरक्षिततेची भावना मोठय़ा प्रमाणात असल्याने त्या एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होऊ शकत नाहीत, असे जॅकलिनचे म्हणणे आहे.
बॉलीवूडमध्ये दोन अभिनेते एकमेकांचे चांगले मित्र असतात, पण बॉलीवूडच्या अभिनेत्री एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होऊ शकत नाहीत. या वास्तवावर जॅकलिन हिने शिक्कामोर्तबच केले आहे. या बाबत तिने सांगितले, तुम्ही स्वत:ला असुरक्षित समजत असाल, तशी भावना तुमच्या मनात कायम घर करून असेल तर तुम्ही कोणाशीही चांगली आणि निखळ मैत्री करू शकत नाही.
बॉलीवूडमध्ये मला अभिनेत्री सोनम कपूर आवडते कारण ती स्वत:ला कधीच असुरक्षित समजत नाही. ती बुद्धिमान असून तिच्यात आत्मविश्वासही आहे. त्यामुळे आयुष्यात तिने खूप काही मिळविले आहे. मीही स्वत:ला कधीच असुरक्षित मानत नाही, असेही तिचे म्हणणे आहे.
जॅकलिनचे श्रीलंका येथे एक रेस्टॉरंट आहे आणि आता तिला मुंबईतही रेस्टॉरंट सुरू करायचे आहे. या निमित्ताने श्रीलंकन आहार आणि खाद्यपदार्थ तिला मुंबईकरांसाठी उपलब्ध करून द्यायचे आहेत तसेच श्रीलंकन खाद्यपदार्थ मुंबईत लोकप्रिय करायचे आहेत.

Story img Loader