बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. काही दिवसांपूर्वी राधिकाच्या ‘पार्च्ड’ या चित्रपटातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तेव्हापासून नेटकरी राधिकाला बॉयकॉट करण्याची मागणी करत आहेत. नेटकऱ्यांनी राधिकाला इंटिमेट सीन देताना पाहिल्यानंतर ‘बॉयकॉट राधिका आपटे’ ट्रेंड होताना दिसत आहे. हे पाहिल्यानंतर अभिनेता आदिल हुसैन सहकलाकार राधिकाचे समर्थन करत पुढे आला आहे.

नेटकऱ्यांनी अजय देवगनच्या ‘पार्च्ड’ चित्रपटात आदिल आणि राधिकामध्ये असलेल्या इंटिमेट सीनला पाहिल्यानंतर हे भारतीय संस्कृतीच्या विरुद्ध असल्याने म्हटले आहे. तर राधिकाला पाठिंबा देत पुढे आलेल्या आदिलने नुकतीच ‘हिंदुस्तान टाइम्स’ला मुलाखत दिली. राधिकाला बॉयकॉट करण्याची मागणी पाहता हे हास्यास्पद असल्याचे आदिलने म्हटले आहे. ‘काही दिवसांपूर्वी गुगुल अलर्ट पाहिल्यानंतर मला याची माहिती मिळाली. मला वाटते की राधिकाला ट्रोल करणे किंवा त्या दृश्याबद्दल काहीही बोलणे हास्यास्पद आहे. मी अशा गोष्टींकडे अजिबात लक्ष देत नाही. मला असं वाटतं की यावर उत्तर देण्याचा एकमेव मार्ग म्हणजे यावर उत्तर न देण आहे,’ असे आदिल म्हणाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Radhika (@radhikaofficial)

आणखी वाचा : मुलीच्या रिसेप्शन पार्टीमध्ये अनिल कपूरचा ‘झक्कास’ डान्स व्हायरल

पुढे आदिल म्हणाला,’ज्या लोकांनी त्याच्या आणि राधिकामधील दृश्यासाठी त्यांना ट्रोल केले आहे. त्या लोकांना कला आणि पॉर्नमधील फरक कळत नाही. कलेवर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. या लोकांनी जीवनाच्या आणि कलेचेच्या शाळेत गेले पाहिजे.’

आणखी वाचा : रिया कपूरच्या रिसेप्शन पार्टीमध्ये जान्हवी आणि खूशी कपूरला पाहून नेटकरी संतापले

‘पार्च्ड’ या चित्रपटाचे दिग्दर्शन लीना यादव यांनी केले आहे. या चित्रपटाची कहाणी ही गुजरातमधील एका गावातील चार महिलांच्या भोवती फिरते. चित्रपटात बालविवाह, हुंडा प्रथा, वैवाहिक बलात्कार यासारख्या सामाजिक वाईट गोष्टी सगळ्यांसमोर ठेवण्यात आल्या आहेत. या चित्रपटात राधिकासोबत आदिल हुसेन, तनिष्ठा चॅटर्जी, सुरवीन चावला महत्वाच्या भूमिकेत आहेत.

Story img Loader