ड्रामा क्वीन राखी सावंतने ‘बिग बॉस मराठी’तून बाहेर पडताच चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. राखीने आपल्या लग्नाची बातमी सर्वांना दिली. तिने बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीशी सात महिन्यांपूर्वी लग्न केलं होतं. या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तिने विवाहबंधनात अडकल्याची कबुली दिली. राखी लग्न झालंय, असं म्हणत असताना आदिल मात्र याबद्दल बोलणं टाळत होता. पण आता आदिलनेही लग्नाच्या वृत्ताबद्दल मौन सोडलंय.
आदिल खानने एका मुलाखतीत राखी सावंतबरोबर लग्न केल्याचं मान्य केलं आहे. पण त्याच्या कुटुंबियांनी अद्याप राखीला स्वीकारलेलं नाही. तो राखीसाठी घरच्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहे. आदिलने ‘ई-टाइम्स’शी बोलताना राखी सावंतशी लग्न केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. “माझं आणि राखीचं लग्न झालं आहे. आम्ही दोघेही एकत्र राहत आहोत आणि आनंदीही आहोत. जोपर्यंत माझं कुटुंब राखीला स्वीकारत नाही, तोपर्यंत लग्नाबद्दल सर्वांना कळावं, असं मला वाटत नव्हतं. पण आता खूप झालं, आता खरं सांगण्याची वेळ आली आहे,” असं आदिल म्हणाला.
“राखी आणि मी एकत्र आहोत हे आता घरच्यांना चांगलंच माहीत आहे, पण त्यांना मनवण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यांनी अद्याप राखीला स्वीकालेलं नाही. या संपूर्ण प्रक्रियेला आता थोडा वेळ लागेल. आधी मी हे लग्न नाकारत होतो, पण मग मला कळलं की जिथे राखी असते तिथे कॉन्ट्रोव्हर्सी होतात. त्यामुळे खूप चर्चा झाल्याने मी लग्न स्वीकारायलाच हवं, असं मला वाटलं” अशी प्रतिक्रिया आदिलने दिली.
“१०-१२ दिवस…”; राखी सावंतशी लग्नाबद्दल आदिल खानची पहिली प्रतिक्रिया, अभिनेत्रीनेही केला नवीन खुलासा
दरम्यान, राखी आणि आदिलने जुलै महिन्यात लग्न केल्याचं त्यांच्या लग्नाच्या कागदपत्रांवर दिसतंय. तसेच दोघांनी एकमेकांना वरमाला घालतानाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. राखीने स्वतःचं नाव फातिमा ठेवत आदिलशी इस्लाम पद्धतीने लग्न केलंय.