एकेकाळी ‘झपाटलेला’ या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. त्यामुळेच या चित्रपटाची लोकप्रियता पाहता ‘झपाटलेला २’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. विशेष म्हणजे ‘झपाटलेला’ आणि ‘झपाटलेला २’ या दोन्ही चित्रपटांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. त्यामुळे या चित्रपटाचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार का असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. म्हणूनच महेश कोठारे यांनी ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये काही खास गोष्टींचा खुलासा केला आहे.

दरम्यान, ‘झपाटलेला ३’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात महेश कोठारेंसह आदिनाथ कोठारेदेखील स्क्रीन शेअर करणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.