‘आदिपुरुष’ चित्रपट येत्या १६ तारखेला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित झाल्यावर अनेकांनी यातील VFX, पात्र, कलाकारांचे लुक याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. आता दाक्षिणात्य अभिनेत्री कस्तुरी शंकरने चित्रपटातील कलाकारांच्या लुकवर टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : Miss World 2023 : ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेचं यजमानपद यंदा भारताकडे; तब्बल २७ वर्षांनी मिळाला बहुमान

सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर शेअर करीत कस्तुरीने म्हटले आहे की, “‘आदिपुरुष’मध्ये प्रभासने प्रभू श्रीरामाची भूमिका साकारली आहे परंतु, प्रभासचा लुक रामासारखा दिसत नसून महाभारतातील कर्णासारखा वाटत आहे… प्रभू राम आणि लक्ष्मण यांना मिशा दाखवण्यात आल्या आहेत असा लुक कोणाच्या मार्गदर्शानुसार केला गेला? ही कोणती परंपरा आहे? यापूर्वी अनेक दिग्गजांनी प्रभू रामाची भूमिका साकारली आहे. मला वाटतं या चित्रपटात प्रभासचा लुक रामासारखा नसून कर्णासारखा आहे.”

हेही वाचा : “मी कोणाला मिठीही मारायचे नाही”, ओम-क्रितीच्या ‘त्या’ व्हिडीओवर सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया यांचे स्पष्ट मत

‘आदिपुरुष’ चित्रपट याआधी जानेवारीमध्ये प्रदर्शित करण्यात येणार होता, पण नंतर रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आला. आता हा चित्रपट १६ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटात प्रभासशिवाय क्रिती सेनॉन, सनी सिंग, सैफ अली खान आणि देवदत्त नागे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. नुकत्याच रिलीज झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलरला आणि गाण्यांना प्रेक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

हेही वाचा : “नट्टू काका सेटवर अनेकदा रडले” जेनिफर मिस्त्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली “एक सुट्टी मागितल्यावर…”

‘आदिपुरुष’नंतर प्रभास बहुचर्चित ‘सालार’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. प्रशांत नील दिग्दर्शित या चित्रपटाची लोक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. याशिवाय प्रभास ‘प्रोजेक्ट के’मध्येही दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.