Adipurush Controversy : आदिपुरुष सिनेमा रिलिज होऊन दहा दिवस होऊन गेले आहेत. मात्र या सिनेमातल्या कलाकरांच्या संवादांवरुन आणि पोशाखांवरुन सुरु झालेला वाद हा काही शमण्याचं नाव घेताना दिसत नाही. या सिनेमातले काही संवाद बदलण्यातही आले आहेत. मात्र प्रेक्षकांचं हे म्हणणं आहे की रामायणासारख्या धर्मग्रंथाचा हा अपमान आहे. या सिनेमाच्या विरोधात वकील कुलदीप तिवारी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात याचिका दाखल केली होती. याविषयीची सुनावणी आज झाली त्यात कोर्टाने आदिपुरुषच्या निर्मात्यांना फटकारलं आहे.

काय म्हटलं आहे कोर्टाने?

आदिपुरुषच्या विरोधात जी याचिका दाखल करण्यात आली होती त्याविषयी न्यायमूर्ती राजेश सिंह चौहान आणि न्यायमूर्ती श्रीप्रकाश सिंह यांच्या डिव्हिजन बेंचने सुनावणी केली. वरिष्ठ वकील रंजना अग्निहोत्री यांनी बाजू मांडत सिनेमातले आक्षेपार्ह संवाद आणि चुकीचे प्रसंग याबाबत न्यायालयाला माहिती दिली. २२ जून रोजी याविषयीची याचिका दाखल करण्यात आली होती. यानंतर कोर्टाने वकील अश्विनी सिंह यांना विचारलं की सेन्सॉर बोर्ड काय करतं आहे?

Sai Pallavi reacts on turning vegetarian for Sita role in Ramayana
‘रामायण’ सिनेमासाठी मांसाहार सोडल्याचे वृत्त पाहून भडकली साई पल्लवी; कायदेशीर कारवाईचा इशारा देत म्हणाली…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
Sunny Deol Confirms His Role in Ramayana
नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात काम करण्याबाबत सनी देओलकडून भूमिका स्पष्ट; म्हणाला, “हा चित्रपट ‘अवतार’प्रमाणे…”
Diljit Dosanjh invokes Rahat Indori poetry amid calls to cancel Indore concert
कॉन्सर्ट रद्द करण्यासाठी बजरंग दलाचे आंदोलन, दिलजीत दोसांझ म्हणाला, “किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है”
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
ravi rana resign
अमरावती : नवनीत राणा म्‍हणतात, “…तर रवी राणा देखील राजीनामा देतील”

सिनेमा हा समाजाचा आरसा आहे असं म्हटलं जातं. येणाऱ्या पिढ्यांना तुम्ही काय शिकवणार आहात? सेन्सॉर बोर्डाला त्यांची जबाबदारी समजत नाही का? कोर्टाने हे देखील म्हटलं आहे की रामायण, कुराण, गुरु ग्रंथसाहेब, भगवद्गीता यांसारख्या धार्मिक ग्रंथाना तरी सोडा.

कोर्टाने आज आदिपुरुष या सिनेमाचे निर्माते, दिग्दर्शक आणि अन्य प्रतिवादी हे कोर्टात उपस्थित का नाहीत? असाही प्रश्न उपस्थित केला. रंजना अग्निहोत्रींनी कोर्टाला हेदेखील सांगितलं की अद्याप याविषयीचं उत्तर सेन्सॉर बोर्डानेही दिलेलं नाही. तसंच सिनेमात रावण वटवाघुळाला मांस खाऊ घालताना दाखवला आहे, सीतेला स्लीव्हलेस ब्लाऊजमध्ये दाखवलं गेलं आहे, वटवाघुळ म्हणजेच रावणाचं विमान दाखवलं आहे, काळ्या रंगाची लंका, सुषेण वैद्याचा उल्लेख न करणं, बिभीषणाच्या पत्नीने लक्ष्मणाला संजीवनी देणं अशा आक्षेपार्ह प्रसंगांवरही आक्षेप घेतला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी आता २७ जून रोजी होणार आहे. मनोज मुंतशीर यांना वादी करायचं की नाही यावरही सुनावणी होणार आहे.

Story img Loader