सध्याच्या बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे ‘आदिपुरुष.’ जसजशी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येत आहे तसतशा या चित्रपटाबद्दलच्या नवनवीन गोष्टी उलगडत आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरला आणि गाण्यांना तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तर आता या चित्रपटाबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता प्रभास प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन सीतेच्या भूमिकेत दिसेल. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे या चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. आता या चित्रपटाने प्रदर्शनाच्या आधीच २०० कोटींची कमाई केली असल्याचं समोर आलं आहे.

आणखी वाचा : प्रदर्शनाच्या आधीच ‘आदिपुरुष’चा होणार वर्ल्ड प्रीमियर, जाणून घ्या कधी, कुठे आणि कोणाला पाहता येणार चित्रपट?

Tollywood.net च्या अहवालानुसार, या चित्रपटाचे तेलुगू थिएट्रिकल राइट्स पीपल मीडिया फॅक्टरीने १८५ कोटींना विकले आहेत. तर जीएसटी धरून ही रक्कम २०० कोटी होत आहे. त्यामुळे प्रदर्शनाच्या आधीच या चित्रपटाने २०० कोटींच्या घरात प्रवेश केला आहे.

हेही वाचा : ‘आदिपुरुष’ चित्रपटासाठी मिळालेल्या मानधनाबाबत देवदत्त नागेचा मोठा खुलासा, म्हणाला…

हा चित्रपट १६ जून रोजी प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम् या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची गाणी आता प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. त्यामुळे हा चित्रपट चित्रपटगृहात उत्तम कामगिरी करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे