दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास हे नाव आता चाहत्यांसाठी नवीन राहिलेलं नाही. ‘बाहुबली’ चित्रपटातून खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आलेला प्रभास लवकरच ‘आदिपुरुष’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेता सैफ अली खानदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. अभिनेत्री क्रिती सेननने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चित्रपट प्रदर्शनाची तारिख जाहीर केली आहे.
क्रितीन तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी सगळ्यांना दिली आहे. क्रितीने आदिपुरुषचं पोस्टर शेअर केलं आहे. यासोबत हा चित्रपट १२ जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे. तर हा चित्रपट वर्ल्ड वाइड 3D मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे तिने सांगितले आहे. या आधी क्रितीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना सांगितले होते की महाशिवरात्रीच्या दिवशी आदिपुरुष या चित्रपटाविषयी एक महत्त्वाची घोषणा करण्यात येणार आहे.
आणखी वाचा : रितेशचा ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स पाहताच जिनिलियाने दिला धक्का अन्…
आणखी वाचा : “Arrange Marriage म्हणजे मटका, मी जर लग्न केल तर…”; प्राजक्ता माळीचे वक्तव्य चर्चेत
दरम्यान, चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. प्रभास, क्रिती सेनन आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट श्रीरामचंद्रावर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. चित्रपटात प्रभास प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, सैफ रावणाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट 3D अॅक्शन ड्रामा प्रकारात मोडणारा असून भूषण कुमार यांची निर्मिती करत आहेत. २०२३ मध्ये प्रदर्शित होणारा हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.