ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुषवरुन झालेला वाद अजूनही शमण्याचं नाव घेत नाहीये. या सिनेमातल्या राम, लक्ष्मण, सीता, हनुमान आणि रावण यांचे पेहराव, त्यांचे संवाद यावरुन वाद होतोच आहे. सिनेमातले काही वादग्रस्त संवाद हटवण्यात आले आहेत. मात्र या सिनेमावर बंदी घालण्यात यावी यासाठी कोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. मात्र एखादा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर वाद निर्माण होणं ही पहिली वेळ नाही. भारतीय सिनेमाच्या इतिहासात असे काही चित्रपट झाले आहेत जे वादात अडकले आहेत. काहींनी वादात अडकून चांगली कमाईही केली काही डब्यात गेले. आज आपण जाणून घेऊयात त्या पाच सिनेमांविषयी ज्यावरुन वाद झाला होता.

पठाण सिनेमाच्या रिलिज आधी वाद

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा पठाण सिनेमा प्रदर्शित होण्याआधी प्रचंड वाद झाला होता. या सिनेमातल्या दीपिकाच्या भगव्या बिकिनीवरुन हा वाद निर्माण झाला होता. मात्र सिनेमा रिलिज झाल्यानंतर जो वाद झाला त्याचा सिनेमाला प्रचंड फायदा झाला. सिनेमाला बंपर ओपनिंगही मिळालं आणि त्या सिनेमाने चांगली कमाईही केली. शाहरुख खानला अनेक दिवसांपासून एका हिटची गरज होती तो या रुपाने त्याला मिळाला.

raja hindustani budget and box office collection
फक्त ६ कोटींचे बजेट असलेल्या सिनेमाने कमावलेले ७६ कोटी, तुम्ही पाहिलाय का २८ वर्षांपूर्वीचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Maharashtrachi Hasyajatra fame prithvik pratap reaction on prajakta mali phullwanti movie
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर ‘फुलवंती’ चित्रपटाची चर्चा, प्राजक्ता माळीने शेअर केला व्हिडीओ; पृथ्वीक प्रताप म्हणाला, “मला फुलवंती पेक्षा जास्त…”
table no 21 joker blind psycholigical thrillers on ott
‘मर्डर २’ पाहिलाय? त्याहूनही भयानक आहेत जिओ सिनेमावरील ‘हे’ सायकॉलिजल थ्रिलर चित्रपट; पाहा यादी
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
Director Nikhil Advani believes that artistic films will never disappear
‘कलात्मक चित्रपट कधीच लोप पावणार नाहीत…’; दिग्दर्शक निखिल अडवाणी
Navri Mile Hitlarla
पाडवा साजरा करण्यासाठी लीलाने केली युक्ती; टायगरला बोलवताच एजेने…; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला

द केरला स्टोरी

द केरला स्टोरी या सिनेमावरुन खूप वाद झाला होता. सिनेमात विशिष्ट धर्माच्या भावना दुखावल्या गेल्याचा आणि हा सिनेमा प्रपोगंडा मूव्ही असल्याचाही प्रचार झाला होता. मात्र अत्यंत कमी बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दोनशे कोटींचा व्यवसाय केला.

डर्टी पिक्चर

विद्या बालन, नसीरुद्दीन शाह, इम्रान हाश्मी यांचा डर्टी पिक्चर हा सिनेमा सिल्क स्मिताच्या आयुष्यावर आधारित होता. या सिनेमावर अश्लीलता पसरवण्याचा आरोप झाला होता. या सिनेमावरुनही खूपच वाद निर्माण झाला होता. मात्र या सिनेमाने खूप चांगली कमाई केली. या सिनेमाला ओपनिंगही चांगलं मिळालं. तसंच या सिनेमामुळे विद्या बालनच्या करिअरचा ग्राफही उंचावला.

बँडिट क्वीन

१९९४ मध्ये बँडिक क्वीन हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. फुलन देवीच्या आयुष्यावर हा सिनेमा होता. मात्र हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांतच चित्रपटगृहांतून हटवण्यात आला. या सिनेमात फूलन देवीच्या बलात्काराचं चित्रण करण्यात आलं होतं. तसंच ठाकूर समाजाच्या हत्येचंही दृश्य होतं. या प्रकरणी फूलन देवीने सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यानंतर हा सिनेमा चित्रपटगृहातून उतरवण्यात आला होता.

परझानिया

२००५ मध्ये परझानिया नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा गुजरातच्या दंगलीवर आधारीत होता. या सिनेमात गुजरात दंग्यांवेळी जे काही घडलं ते बीभत्सपणे दाखवण्यात आलं असा आरोप झाला होता. या सिनेमावर राजकीय पक्षांनी विरोध केला होता तसंच धार्मिक संघटनांनी या सिनेमाला विरोध केला. त्यानंतर या सिनेमावर बंदी घालण्यात आली.