छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सिंगिंग रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडल’ आहे. ‘इंडियन आयडल’चे यंदाचे हे १२ पर्व सुरु आहे.  हा शो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतो. दरम्यान, दिवंगत गायक किशोर कुमार यांना श्रद्धांजली वाहणाऱ्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागाला सोशल मीडियावर प्रचंड टीका करण्यात आली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शोचा सुत्रसंचालक आणि गायक आदित्य नारायणने वक्तव्यं केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आदित्यने नुकतीच’बॉलिवूड स्पाय’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत शो विरोधात झालेल्या टीकेबद्दल आदित्यने वक्तव्य केलं आहे. “मला वाटतं की दोन ते तीन आठवड्यांआधी आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) बंद झालं. त्याचा पूर्ण राग ते आमच्यावर काढत आहेत. आई-वडिलांनी टीव्हीचं रिमोर्ट घेतलं आहे आणि ते ‘इंडियन आयडल’ बघतात. यामुळे आपली तरुण पिढी ही नाखूष आहे. त्याचा राग कुठे काढायचा हे त्यांना कळतं नाही. यात मी सुद्धा येतो, मला सुद्धा अशी भावना येते. ७-७.३० ला मी मॅच बघायला बसायचो. मी तर क्रिकेटच्या टीम माझ्या फोनच्या अॅप्समध्ये देखील बनवल्या होत्या. हे मी गेल्या वर्षी केलं आणि या वर्षी देखील. टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या सगळ्या गोष्टींचा थोडा आनंद आपण घेतं असतो. फक्त सध्या आपल्याकडे जास्त वेळ आहे म्हणून असं होतं.”

फक्त नेटकरी नव्हे तर या आधी किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांनी देखील शोला पसंत करत नसल्याचे सांगितले होते.

आणखी वाचा : खुद्द आदित्य नारायणनेच केला इंडियन आयडलचा पर्दाफाश

दरम्यान, या आधी शो मध्ये असलेले स्पर्धक पवनदीप राजन आणि अरुणिता कांजिलाल या दोघांच एकमेकांवर प्रेम असल्याचं दाखवण्यात आलं होतं. तर आदित्यने हे सगळं खोटं असल्याचं कबुल केलं होतं.