बॉलिवूड गायक आदित्य नारायण आणि पत्नी श्वेता अग्रवाल यांच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे. आदित्यने एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही माहिती दिली आहे. २४ फेब्रुवारी रोजी श्वेता अग्रवालने मुलीला जन्म दिला आहे.
आदित्यने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. पण आदित्यने त्याच्या मुलीचा फोटो नाही तर त्याचा आणि श्वेताचा लग्नातील फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत २४ फेब्रुवारी रोजी देवाच्या आशीर्वादाने आमच्या घरी एका मुलीचा जन्म झाला आहे आणि ही बातमी देताना मला आनंद होत आहे, असे कॅप्शन आदित्यने दिले आहे.
आणखी वाचा : “अमिताभ समोरच्याला घाबरवतो का?”; किशोर कदम यांनी सांगितला बिग बींसोबत काम करण्याचा अनुभव
आणखी वाचा : रितेशचा ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स पाहताच जिनिलियाने दिला धक्का अन्…
आदित्यने एका मुलाखतीत सांगितले की, “प्रत्येकजण मला म्हणत होता की मुलगा असेल. पण कुठेतरी मला आशा होती की मी एका मुलीचा बाप होईल. मुली नेहमी त्यांच्या वडिलांच्या जवळ असतात आणि मला खूप आनंद होतो की माझी छोटी देवदूतासारखी आली आहे. श्वेता आणि मी खूप भाग्यवान आहोत की आम्ही पालक झालो आहोत. श्वेताबद्दल माझे प्रेम आणि आदर द्विगुणित झाला आहे. जेव्हा एखादी स्त्री गर्भधारणेच्या टप्प्यात असते आणि मुलाला जन्म देते तेव्हा तिला बर्याच गोष्टींचा सामना करावा लागतो. आदित्य आणि श्वेता १ डिसेंबर २०२२ रोजी लग्न बंधनात अडकले आहेत.”