लग्नसमारंभ म्हटलं की सगळीकडे उत्साहाचा आणि आनंदाचं वातावरण असतं. या काळातील प्रत्येक क्षण हा अविस्मरणीय असतो. पण, लग्नकार्यामध्ये आनंदासोबतच काही भन्नाट किस्सेदेखील घडतात, जे कथीच विसरणं शक्य नसतं. असाच किस्सा सूत्रसंचालक, गायक आदित्य नारायणसोबत घडला आहे. ऐनलग्नात त्याचा पायजमा फाटला आणि त्याची चांगलीच फजिती झाली,असं स्पॉटबॉयच्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

काही दिवसांपूर्वीच आदित्य आणि श्वेता अग्रवाल यांनी लग्नगाठ बांधली. या लग्नसमारंभातील फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरच व्हायरल होत आहेत. यामध्येच आदित्यसोबत घडलेला किस्सादेखील चर्चेत येत आहे.

“लग्न लागत असताना ज्यावेळी श्वेताला वरमाला घालायची होती, त्यावेळी माझ्या भावांनी मला उचललं. त्यानंतर माझ्या मित्रांनीदेखील मला उचललं. पण त्याचवेळी माझा पायजमा फाटला. खरं तर तो क्षण अत्यंत लाजिरवाणा होता. पण, हा क्षण कायम माझ्या लक्षात राहिलं”, असं आदित्य म्हणाला.

आणखी वाचा- जामिनावर सुटलेल्या भारतीने आदित्य नारायणच्या लग्नात धरला ठेका; पाहा व्हिडीओ

दरम्यान, आदित्य नारायण हा लोकप्रिय सूत्रसंचालक असून तो एक गायकदेखील आहे. गायक उदित नारायण यांचा तो एकुलता एक मुलगा आहे. तर श्वेता ही अभिनेत्री आहे. तिने शापित या चित्रपटातून २०१० मध्ये कलाविश्वात पदार्पण केलं. जवळपास १० वर्ष एकमेकांनी डेट केल्यानंतर या दोघांनी जुहूमधील इस्कॉन टेम्पल येथे लग्नगाठ बांधली.

Story img Loader