छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सिंगिग रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडल १२’ कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतो. शोचा सुत्रसंचालक आदित्य नारायण नेहमीच शोच्या बाजून बोलताना दिसतो. तर ‘इंडियन आयडल’मध्ये आधीच निर्णय ठरलेले असतात या आरोपांवर आदित्यने आता वक्तव्य केलं आहे.

आदित्यन नुकतीच ‘स्पॉटबॉय’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने ‘इंडियन आयडल’मध्ये आधीच निर्णय ठरवलेले असतात असा आरोप करणाऱ्या ट्रोलर्सला सुनावले आहे. “आमचे निर्माते सोनी, फ्रेमेंटल आणि टीसीटीच्या संपूर्ण टीमसह सध्याच्या पर्वाला प्रेम मिळतं आहे. गेल्या दशकात सर्वाधिक पाहिलेला हा रिअॅलीटी शो आहे. आम्हाला यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. आम्ही या शोला मिळणाऱ्या नकारात्मकतेबद्दल विचार करणार नाही. आता आम्ही शोच्या शेवटच्या चार आठवड्यात आहोत. हे पर्व आम्हाला प्रेमाने आणि आनंदाने संपवायचा आहे,” असे आदित्य म्हणाला.

आणखी वाचा : आमिर आणि किरण रावच्या घटस्फोटावर राखी सावंत म्हणाली…

आणखी वाचा : ‘इमरान खान आणि करीनाचे लग्न…’, करण जोहरने व्यक्त केली होती इच्छा

स्पर्धकांबद्दल चांगल्या गोष्टी सांगण्याचा दबाब परिक्षकांवर नाही असं म्हणतं आदित्य म्हणाला, “प्रत्येकव्यक्ती जी ‘इंडियन आयडल’च्या स्पर्धकांनाबद्दल फक्त सकारात्म बोलण्याचे उदाहरण देत आहे. ती व्यक्ती एक सहकारी आणि मित्र आहे. मी त्यांना विश्वास देतो की जो पर्यंत मी इंडियन आयडलचे सुत्रसंचालन करत आहे. तो पर्यंत इथे कोणालाच उगाच स्तुती करण्याची गरज नाही. आपले विचार सगळ्यांसमोर मांडा आणि तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. आमच्या शोमध्ये येऊन आम्हाला आशीर्वाद द्या. मी हे सगळं माझ्यासाठी बोलतं आहे.”

Story img Loader