पांचोली पिता-पुत्रावर सध्या पोलिसांचे सावट असल्याचे दिसत आहे. सध्या जिया खान आत्महत्याप्रकरणी सूरज पांचोलीला अटक करण्यात आलेली आहे. हे प्रकरण संपत नाही, तोच आता आदित्य पांचोलीवर गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. शेजा-यांना शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध भार्गव पटेल यांनी वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या आधारावर कलम ४५२ व ३२३ अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली.
आणखी वाचा