बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा व आम आदमी पार्टीचे नेता राघव चड्ढा २४ सप्टेंबर रोजी लग्नबंधनात अडकले. त्यांनी उदयपूरमध्ये कुटुंबीय, मित्र-मैत्रिणीच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह आमदार आदित्य ठाकरे देखील पोहोचले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आदित्य ठाकरेंनी शेअर केले परिणीती चोप्रा-राघव चड्ढांच्या लग्नातील Unseen Photos, लूकने वेधलं लक्ष

आदित्य ठाकरेंनी परिणीती व राघव यांच्या लग्नातील एक फोटो शेअर केला होता. त्यात ते वधू व वराबरोबर पारंपारिक कपड्यांमध्ये दिसले होते. त्यानंतर आता त्यांनी राघव चड्ढांबरोबरचा एक न पाहिलेला फोटो शेअर केला आहे. यात दोघेही काळ्या रंगाच्या थ्री पीस सुटमध्ये दिसत आहेत. “आणि हा नवरदेव राघव चड्ढासोबतचा फोटो. आम्ही Cool दिसतोय ना?” असं कॅप्शन आदित्य यांनी दिलं आहे.

दरम्यान, त्यांच्या या फोटोवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहेत. ‘भारतातील दोन सुशिक्षित, तरुण नेते एकाच फोटोत’, ‘दोघेही छान दिसत आहात,’ ‘भारतीय राजकारणाचं भविष्य’ अशा कमेंट्स युजर्स यावर करत आहेत.