भारतात वास्तव्य करण्यास मानवतेच्या दृष्टिकोनातून कायदेशीर मान्यता द्यावी, ही पाकिस्तानमधील गायक अदनान सामी याने केलेली विनंती मान्य करण्यात आल्याने सामीचा बेमुदत कालावधीसाठी भारतात वास्तव्य करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.परकीय कायद्यातील अनुच्छेद ३ नुसार सामी याला मायदेशात पाठविण्यातून सवलत देण्यात आली आहे, असे गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी मंगळवारी लोकसभेत सांगितले. मानवतेच्या दृष्टिकोनातून आपल्याला भारतात वास्तव्य करण्याची मुभा द्यावी, अशी विनंती सामी याने २६ मे रोजी गृहमंत्रालयाकडे केली होती. त्यावर गृहमंत्रालयाने काळजीपूर्वक विचार केला. पुढील आदेश येईपर्यंत सदर आदेश वैध राहणार आहेत.
अदनान सामीला भारतात वास्तव्याची मुभा
भारतात वास्तव्य करण्यास मानवतेच्या दृष्टिकोनातून कायदेशीर मान्यता द्यावी, ही पाकिस्तानमधील गायक अदनान सामी याने केलेली विनंती मान्य..
First published on: 05-08-2015 at 04:02 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adnan sami allowed to live in india