अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता स्थापन केली आहे. तालिबानी दहशतवादी रविवारी काबूलमध्ये घुसले व त्यानंतर घनी यांचे सरकार कोसळले. सत्तांतरण केल्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देखील देश सोडला आहे. उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनीही अफगाणिस्तान सोडला आहे. सध्या अफगाणिस्तानमध्ये भायानक चित्र आहे. अक्षरशः थरकाप उडवणारे अफगाणिस्तानमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहेत. दरम्यान बॉलिवूड गायक अदनान सामीने सोशल मीडियावर तालिबानींचा व्हिडीओ शेअर करत अमेरिकेवर निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अदनान सामीने त्याच्या ट्वीटर अकाऊंटवर तालिबानींचा जीममध्ये विचित्र प्रकारे व्यायाम करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत अदनान सामीने अमेरिकेवर निशाणा साधला आहे. ‘प्रिय अमेरिका, तुम्ही या लोकांसोबत हरलात?’ या आशयाचे ट्वीट करत त्यासोबत हसण्याचे इमोजी आणि हॅशटॅग वापरत अमेरिकेला लाज वाटली पाहिजे असे म्हटले आहे. जीममधील गोष्टी वापरता न येणाऱ्या लोकांकडून अमेरिकेसारखा अती प्रगत देश पराभूत झाल्याचे अदनानने ट्विटमधून अप्रत्यक्षपणे अधोरेखित केले आहे. सध्या अदनान सामीने शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : तालिबानी दहशतवादी लहान मुलांच्या पार्कमध्ये खेळतानाचे व्हिडीओ व्हायरल

एप्रिल 2021 मध्ये जो बायडेन यांनी अमेरिकन सैन्य मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर तालिबान सक्रिय झाले होते. केवळ 90 हजार तालिबानी असणाऱ्या संघटनेने 3 लाखाहून अधिक सैन्य असणाऱ्या अफगाणी लष्कराला आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले.