भारतात पॉर्न साईट्सवर बंदी असली तरी कोणत्या ना कोणत्या मार्गाने लोक या साईट्सचा वापर करताना दिसतातच. अमेरिकेत पॉर्न इंडस्ट्री मनोरंजन क्षेत्राचाच एक भाग म्हणून कार्यरत आहे. बरेच तरुण तरुणी या व्यवसायात करिअर घडवतात, पॉर्नस्टार बनतात आणि मग यातून बाहेरही पडतात. हे सगळं आपण पाहिलेलं आहे. अशाच पॉर्न फिल्म्समधून पुढे आलेल्या पॉर्नस्टार काग्नी लिन कार्टर हीने आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे.
वयाच्या ३६ व्या वर्षी काग्नी लिन कार्टरच्या आत्महत्येने तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. २००८ मध्ये काग्नीने या पॉर्न फिल्म्सच्या विश्वात पदार्पण केलं. काग्नीने आत्महत्या करून स्वतःला संपवलं असल्याचं स्पष्ट होत आहे. तिने आत्महत्या का केली याचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. सध्या तिच्या अंत्यसंस्कारासाठी तिच्याच मित्रमंडळींकडून पैसे गोळा केले जात असल्याचंही स्पष्ट झालं आहे.
आणखी वाचा : शाहरुख खान अन् ऋतुराज सिंह होते एकाच वर्गात, SRK च्या आग्रहाखातर मुंबईत आले अन्…, त्यांनीच सांगितलेला किस्सा
काग्नी लिन कार्टरने पॉर्नस्टार जॉनी सीन्सबरोबर बऱ्याच फिल्म्ससाठी काम केलं आहे. जॉनी सीन्स गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पहिल्या भारतीय जाहिरातीमुळे चर्चेत होता. आता काग्नीच्या आत्महत्येमुळे पुन्हा एकदा या दोघांची आठवण चाहत्यांनी काढली आहे. काग्नीने हा टोकाचा निर्णय का घेतला याचा खुलासा अद्याप झालेला नाही किंवा पोलिसांना कोणीतही सुसाइड नोट मिळालेली नाही.
मीडिया रिपोर्टनुसार काग्नी गेल्या काही महिन्यांपासून मानसिक आजाराशी झुंज देत होती अन् यावर ती उपचारही घेत होती. या आजाराला कंटाळूनच तिने आपल्या राहत्या घरी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असावा असा अंदाज तिच्या मित्र मंडळींनी बांधला आहे. तिच्या मित्रांनी सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली असून काग्नीच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे गोळा करायचे आवाहनही केले आहे.