गेल्या काही दिवसांपासून अडल्ट फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्रींच्या निधनाच्या बातम्या समोर येत आहेत. जानेवारीमध्ये थायना फील्ड्स तिच्या घरात मृतावस्थेत आढळली होती. तर, फेब्रुवारीमध्ये ३६ वर्षीय कॅग्नी लिन कार्टरने आत्महत्या केली होती. त्यानंतर आता २६ वर्षीय अभिनेत्री राहत्या घरात मृतावस्थेत आढळली आहे. सोफिया लिओनी असं तिचं नाव आहे.
सोफिया लिओनीचे सावत्र वडील माईक रोमेरो यांनी ‘गो फाइंड मी’ वर निवेदन देऊन तिच्या निधनाची पुष्टी केली आहे. सोफियाच्या वडिलांनी सांगितलं की तिच्या निधनाने त्यांच्या कुटुंबाला धक्का बसला आहे. “तिची आई आणि कुटुंबियांच्या वतीने, मला आमच्या प्रिय सोफियाच्या निधनाची बातमी द्यावी लागत आहे. सोफियाच्या आकस्मिक मृत्यूने तिचे कुटुंबीय आणि मित्रांना मोठा धक्का बसला आहे,” असं तिचं वडील म्हणाले.
“मी घटस्फोट घेण्याचा निर्णय…”; मलायका अरोराचे विधान, पोटगीचा उल्लेख करत म्हणाली…
सोफियाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, ती १ मार्च रोजी तिच्या अपार्टमेंटमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळली होती. “१ मार्च २०२४ रोजी सोफिया आम्हाला तिच्या अपार्टमेंटमध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडली होती. स्थानिक पोलिसांकडून मृत्यूच्या कारणाचा तपास सुरू आहे. तिला प्रवास करण्याची आवड होती आणि तिला तिच्या आजूबाजूच्या प्रत्येकाला नेहमी आनंदी ठेवायचा प्रयत्न करायची,” असं ते म्हणाले.
सोफियाचा जन्म १० जून १९९७ रोजी अमेरिकेतील मियामी इथं झाला होता. तिने वयाच्या १८ व्या अडल्ट एंटरटेनमेंट इंडस्ट्रीत प्रवेश केला होता. तिची संपत्ती १ दशलक्ष डॉलर्स असल्याचं म्हटलं जातंय. कॅग्नी लिन कार्टर, जेसी जेन आणि थायना फील्ड्स यांच्यानंतर सोफिया ही चौथी अडल्ट स्टार आहे, जिचं अचानक निधन झालंय.