अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी ताबा मिळवल्यानंतर अनेक देशवासियांचा देश सोडण्यासाठी संघर्ष सुरु केला आहे. तालिबान्यांनी देशावर ताबा मिळवताच देशवासियांचा आणि खास करून महिलांचा छळ करण्यास सुरुवात केलीय. अशात स्थिती महिलांसाठी अफगाणिस्तानमध्ये राहणं आता कठीण झालंय. तालिबानी दहशतवादी महिलांवर बुरखा परिधान करण्यासाठी जबरदस्ती करत आहेत. तसचं नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर छळ सुरुय. अशात अफगाणिस्तानमधील लोकप्रिय पॉपस्टार आर्याना सईदने या संपूर्ण स्थितीसाठी पाकिस्तानला जबाबदार धरलं आहे. तालिबान्यांना पाकिस्तानचा पाठिंबा असून त्याचे पुरावे देखील आहेत असा दावा आर्यानाने केलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तालिबान्यांनी देश ताब्यात घेतल्यानंतर अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यात आर्यानाला यश आलं आहे. अमेरिकेच्या सैन्याच्या मदतीने तिने देश सोडला असून ती वॉश्गिंटनमध्ये पोहचली. अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर ती म्हणाली, ” मला आशा आहे की आंतरराष्ट्रीय संघटना पाकिस्तानवर दबाव आणू शकतील. पाकिस्तानमुळे अफगाणिस्तानमध्ये हे संकट उभ ठाकलं आहे. आतापर्यंत सगळ्यांना कळून चुकलंय की की तालिबानला पाकिस्तानकडून निधी पुरवला जातोय.” असं आर्याना म्हणाली.

हे देखील वाचा: “सेटवर बिग बींच्या पायाला स्पर्श करण्याची परवानगी नाही”, ‘कौन बनेगा करोडपती’च्या स्पर्धकाचा खुलासा

तसंच पाकिस्तानमध्येच तालिबानी दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात असल्याचा आरोप आर्यानाने केलाय. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायांनी पाकिस्तानला निधी पुरवणं बंद करावं असं आवाहन तिने केलंय. “पाकिस्तानला निधी देणं तात्काळ बंद केलं पाहिजे. जेणे करून ते तालिबान्यांना निधी देऊ शकणार नाहीत.” असं आर्याना म्हणाली.

आणखी वाचा: अफगाणिस्तानमधील लोकप्रिय पॉपस्टार आर्यानाला देश सोडण्यात यश, म्हणाली, ‘त्या अविस्मरणीय रात्रीनंतर…”

तसचं अफगाणिस्तानमध्ये दोन दशकांपासून असलेलं सैन्य अमेरिकेने काढण्याचा निर्णय घेतल्याने देखील आर्यानाने अमेरिकेवर टीका केली आहे. “२० वर्ष देशात सैन्य ठेवल्यानंतर आणि लाखो डॉलर्स खर्च केल्यानंतर अमेरिकेने अचानक सैन्य देशाबाहेर काढण्याचा निर्णय घेतला हे धक्कादायक होतं.” असं म्हणत आर्यानाने नाराजी व्यक्त केलीय. आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध संस्था संघटनांनी अफगाणिस्तानच्या नागरिकांची मदत करावी असं आवाहन तिने केलंय.