बॉलिवूडमध्ये खिलाडी म्हणून प्रसिध्द असलेला अभिनेता अक्षय कुमार सध्या दिल्लीत असून, रजनीकांत यांच्या ‘२.०’ या साय-फाय अॅक्शन प्रकारातील चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. क्रिकेटप्रेमी अक्षयने शूटिंगमधून वेळ काढून मित्रपरिवार आणि आपल्या मुलांसह श्रीलंका वि इंग्लंड ‘टी-20’ सामन्याचा आनंद घेतला.
After a hard week on #Robot2 cant tell u’ll how good it feels to enjoy a match with my kids & friends in Delhi #WT20 pic.twitter.com/oFGZKjXucd
— Akshay Kumar (@akshaykumar) March 26, 2016
टि्वटरवर शेअर करण्यासाठी त्याने स्टेडिअमवरून काही छायाचित्रे सुद्धा काढली. अर्थातच अक्षय कुमार स्टेडिअमवर आलेला पाहून सगळ्या चाहत्याचे लक्ष त्याच्याकडे लागले.
‘२.०’ चित्रपटात तो खलनायकाची भूमिका साकारत असून, रजनीकांत याच्या ‘एथिरन’ चित्रपटाचा हा सिक्वेल असल्याचे सांगण्यात येते.
पाहा: अक्षय कुमारचा ‘क्रो लूक’; २.० मध्ये खलनायकी भूमिकेत