नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ चित्रपटाची सर्व स्तरांवरून प्रशंसा केली जात आहे. बॉलीवूडकरांनाही या चित्रपटाने याडं लावून टाकलयं. बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तर ‘सैराट’ पाहिल्यानंतर नि:शब्द झाला होता. चित्रपट पाहिल्यानंतर आपण नि:शब्द झाल्याचे ट्विट आमिरने केले होते. त्यानंतर आता आपल्या अभिनयासाठी नेहमीच नावाजला जाणारा अभिनेता इरफान खान यानेही ‘सैराट’ची प्रशंसा केली आहे.
इरफानने आपल्या टि्वटद्वारे ‘सैराट’चं आणि नागराज मंजुळेचं कौतुक केलयं. ‘सैराट’ हा भारतीय चित्रपटसृष्टीचा नवा चेहरा असल्याचे त्याने म्हटलेयं. यावर नागराजने धन्यवाद असे ट्विट केले.
लवकरचं इमरानचा ‘मदारी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader