सुपरस्टार प्रभासचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट यावेळी चांगलाच चर्चेत होता तो नकारात्मक कारणांसाठी. प्रभू श्रीराम यांचं वाईट चित्रीकरण, रामायणासारख्या महाकाव्याशी केलेली छेडछाड, खराब व्हीएफएक्स, आक्षेपहार्य संवाद अशा वेगवेगळ्या कारणांमुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणकून आपटला. दिग्दर्शक ओम राऊत, लेखक मनोज मुंतशीर आणि प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणारा प्रभास यांच्यावर लोकांनी प्रचंड टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काहींनी प्रभासवर टीका केली तर प्रभासच्या चाहत्यांनी नेहमीप्रमाणेच त्याचं कौतुक केलं. आता नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार चाहत्यांना प्रभास पुन्हा एकदा अशाच मोठ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ‘आदिपुरुष’नंतर प्रभास आता लवकरच भगवान शंकराच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. ट्रेड एक्स्पर्ट रमेश बाला यांनी याबद्दल ट्वीट करत माहिती दिली असून निर्माते विष्णु मंचू यांनी या गोष्टीची पुष्टीही केली आहे.

आणखी वाचा : शाहरुखच्या ‘जवान’चा ‘गोरखपुर रुग्णालय दुर्घटने’शी नेमका संबंध कसा? जाणून घ्या ‘या’ दाहक वास्तवाबद्दल

आपल्या ट्वीटमध्ये रमेश बाला लिहितात, “खात्रीशीर सूत्रांच्या माहितीनुसार रेबेल स्टार प्रभास हा लवकरच विष्णु मंचू यांच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये एक महत्त्वाची अन् मोठी भूमिका साकारणार आहे. त्या प्रोजेक्टचं नाव आहे ‘कन्नप्पा – अ ट्रू इंडियन एपिक’.” रमेश बाला यांचं हे ट्वीट पुन्हा शेअर विष्णु मंचू यांनी ‘हर हर हर महादेव’ असं लिहीत या चित्रपटाची पुष्टी केली आहे.

या चित्रपटात प्रभास भगवान शंकराच्या भूमिकेत दिसणार आहे. लवकरच या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होणार आहे. मुकेश सिंग या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत तर यात क्रीती सेनॉनची बहीण नूपुर सेनॉनही झळकणार आहे. याबरोबरच प्रभासच्या ‘सलार १’ची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. हा चित्रपट नोव्हेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. याबरोबरच प्रभास ‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटावरही काम करत आहे.