आपलं होम प्रोडक्शन ‘क्रिश-३’ च्या चित्रिकरणात सध्या व्यस्त असलेला अभिनेता ह्रतिक रोशन निर्माता-दिग्दर्शक करन जोहरचा नवा सिनेमा ‘शुध्दी’ मध्ये दिसणार आहे.
‘शुध्दी’च्या मिमित्ताने पुन्हा एकदा ह्रतिक रोशन, करन जोहर आणि करन मल्होत्रा एकत्र काम करणार आहेत.
याबाबतची अधिकृत माहिती ट्विटरवर देताना करन जोहर म्हणाला कि, “Team Agneepath is back…@KaranMalhotra21 will direct his next with @iHrithik in a 2014 diwali release titled SHUDDHI(purification)”
शुध्दी, म्हणजे निर्मळ, याचे लेखन करन मल्होत्रा आणि त्याची पत्नी एकताने केले आहे.
या चित्रपटाचा नायक ठरवण्यात आला असला तरी चित्रपटातील नायिका आणि व्हिलन कोण साकारणार यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही.
‘शुध्दी’ हा नाटकी-रोमॅंटीक चित्रपट असेल. याचे चित्रिकरण मुंबई आणि उत्तराखंडमध्ये होणार असून पुढील वर्षी म्हणजेच २०१४ साली दिवाळीमध्ये तो प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.
ह्रतिक रोशनने याआधीच सिध्दार्थ आनंदचा ‘नाईट अॅण्ड डे’ चा रिमेक आणि शेखर कपूरचा ‘पानी’ हे चित्रपट साईन केले आहेत.  

Story img Loader