देशासह राज्यात करोनाचा धोका वाढताना दिसतोय. गेल्या काही दिवसात करोनाचे वाढते रुग्ण पाहता आता चिंता आणखी वाढू लागली आहे.

बॉलिवूडमध्ये देखील करोनाचा संसर्ग वाढताना दिसतोय.यातच अभिनेता रणबीर कपूर आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे करानोतून बाहेर पडत नाहित तर अभिनेत्री आलिया भट्टला करोनाची लागण झाली आहे. आलिया भट्टला करोनाची लागण झाल्यानंतर आलियाची आई सोनी राजदान यांची चिंता वाढल्याचं दिसतंय.

आलिया भट्टला करोनाची लागण झाल्यानंतर सोनी राजदान यांनी नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. करोनाची दुसरी लाट धोदायक असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. सोनी राजदान यांनी ट्विटरवर एक कविता पोस्ट केली आहे. यात त्या म्हणाल्या आहेत, “ही सर्वसामान्य लाट नाही. ही सगळीकडे आहे. आपल्या घरात, आपल्या केसात.मला थोडी भीती वाटतेय. ही कोणतीही सामान्य लाट नाही .. ती सर्वत्र आहे .. माहित नाही यापासून आम्ही कसे वाचू. कसं स्वत: चं संरक्षण करू. इथून तिथून सगळीकडूनच ही सगळीकडे आहे.” अशा आशयाची कविता करत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

गंगूबाई काठियावाडी सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना करोनाची लागण झाली होती. तेव्हा आलियानेदेखील स्वत:ला होम क्वारंटाइन केलं होतं. सर्व दक्षता घेऊनही आलियाला करोनाची लागण झाल्याने आई सोनी राजदान चिंतेत आहेत. याआधी देखील सोनी राजदान यांनी अभिनया क्षेत्रातील कलाकारांना लस देण्याची मागणी केली होती. कॅमेरासमोर त्यांना मास्क घालणं शक्य नसल्याने कलाकारांना लस दयावी असं सोनी राजदान यांचं म्हणणं होतं.

आलिया प्रमाणेच गेल्या काही दिवसात सतीश कौशिक, कार्तिक आर्यन , परेय़श रावल अशा अनेक कलाकारांनी करोनाची लागण झाली आहे.

Story img Loader