शनिवारी रात्री मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर एनसीबीने छापा टाकला. या छाप्यामध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसोबत आणखी १२ लोकांना ताब्यात घेण्यात आले. रविवारी आर्यनला अटक करण्यात आली. आर्यन ड्रग्स विक्रेत्यांच्या नियमित संपर्कात असल्याचे मोबाईलवरील चॅटवरून स्पष्ट झाल्याचा दावा एनसीबीने केला आहे. या कारवाईनंतर सोशल मीडियावर कॉर्डेलिया क्रूझ पार्टीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

क्रूझवरचा हा पार्टीचा व्हिडीओ इन्स्ंटट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये क्रूझवर जोरदार पार्टी सुरु असल्याचे दिसत आहे. या पार्टीमध्ये तरुणवर्ग अधिक असल्याते दिसत आहे. पार्टीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : KBC 13 : १२ लाख ५० हजार रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर स्पर्धकाने सोडला गेम, तुम्ही देऊ शकाल का उत्तर?

आणखी वाचा : “अनेक वर्षांपासून हा त्रास सहन करत आहे…,” त्वचेच्या ‘या’ आजारामुळे यामी गौतम त्रस्त

एनसीबी करत असलेल्या चौकशीतून आर्यन गेल्या ४ वर्षांपासून ड्रग्जचे सेवन करत असल्याचे समोर आले आहे. भारताबाहेर यूके, दुबई आणि इतर काही देशांमध्ये आर्यनने ड्रग्ज सेवन केल्याचे सांगितले आहे. सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, आर्यन खानला क्रूझवरील पार्टीमध्ये पाहुणा म्हणून बोलावण्यात आलं होतं. पार्टीत जाण्यासाठी त्याला कोणतेही पैसे भरावे लागले नव्हते. चौकशी दरम्यान आर्यन खानने कार्यक्रमाच्या आयोजकांना आपल्या नावाचा वापर करत इतरांना आमंत्रण दिलं असा दावा केला आहे.