दाक्षिणात्य अभिनेता प्रभास हा आता फक्त संपूर्ण भारतातच नाही तर जगभरात लोकप्रिय झाला आहे. ‘बाहुबली’ या चित्रपटाने त्याला एक वेगळी ओळख दिली असं म्हणायलाही हरकत नाही. या चित्रपटामुळे त्याला फक्त फेम मिळालं नाही तर प्रसिद्धीबरोबरच पैसाही भरपूर मिळाला. या चित्रपटानंतर त्याने त्याच्या मानधनामध्ये कैक पटींनी वाढ केली.
एस एस राजामौली यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’ हे दोन्ही चित्रपट तुफान गाजले. बाहुबली दोन नेता जगभरातून १००० हून अधिक कोटींची कमाई केली होती. या चित्रपटातील प्रभासच्या कामाचं सर्वत्र कौतुक झालं. या चित्रपटामुळे त्याचा चाहता वर्गही प्रचंड वाढला. या चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे आणि त्याच्या झालेल्या कौतुकामुळे प्रभासने त्याची फी चांगलीच वाढवली.
रिपोर्टनुसार ‘बाहुबली’पूर्वी प्रभास एका चित्रपटासाठी २० कोटी रुपये मानधन आकाराचा. बाहुबली साठीही त्याला २० कोटी फी मिळाली होती असं बोललं जातं. पण बाहुबली ला मिळालेल्या यशानंतर त्याने त्याचे मानधन २० कोटींवरून थेट १०० कोटींवर नेले. ‘राधे श्याम’ चित्रपटासाठीस त्याने शंभर कोटी मानधन आकारलं होतं. तर आता त्याने त्याचं मानधन वाढवून १०० कोटींहून थेट १५० कोटींवर नेलं आहे. त्याच्या आगामी आदिपुरुष, स्पिरिट, सालार या चित्रपटांसाठी त्याने १५० कोटी मानधन घेतलं आहे असं बोललं जातं.
त्यामुळे आता त्याच्या आगामी चित्रपटांबरोबरच या चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी तो आकारात असलेल्या मानधनाची ही सर्वत्र चर्चा आहे. तो घेत असलेल्या मानधनाचा आकडा ऐकून सर्वात जण थक्क झाले आहेत.