सध्या जनतेला नाताळ आणि नववर्षांच्या सुट्ट्यांचे वेध लागले आहेत. या काळात बच्चे कंपनीला सुट्टी असल्याने सह्जइकच पालक त्यांना फिरायला नेतात. बॉलिवूडचे कलाकारांचा व्हेकेशन मोड अधूनमधून सुरु असतोच. नुकताच हृतिक रोशन कथित गर्लफ्रेंड सबा आझाद आणि मुलांना घेऊन फिरायला गेला आहे. आता यात मराठी कलाकारदेखील मागे नाहीत. महाराष्ट्राची क्रश ऋता दुर्गुळे आपल्या पतीबरोबर फिरायला गेली आहे, नुकतीच तिने पोस्ट शेअर केली आहे.
‘फुलपाखरू’ मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री ऋता दुर्गुळे आज मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे. ‘अनन्या’ आणि ‘टाइमपास ३’ चित्रपटांतून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ऋता पती प्रतीक शाहबरोबर दुबईमध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली आहे. तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. ऋता याआधीदेखील पतीबरोबर परदेशात फिरायला गेली होती.
ऋता लवकरच नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कन्नी’ असं तिच्या नवीन चित्रपटाचं नाव आहे. २०२३ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल. ‘कन्नी’ चित्रपटाच्या निमित्ताने ऋता आणि अजिंक्य राऊत ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. याआधी त्यांनी ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. ऋताच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी यांनी केलं आहे. अभिनेता अमित भरगड, शुभांकर तावडे, ऋषी मनोहर, अभिनेत्री वल्लरी विराज हे कलाकारही झळकणार आहेत.