अभिनेता रणबीर कपूर गेले काही दिवस त्याच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. प्रत्येक चित्रपटात वैविध्यपूर्ण भूमिकेत दिसत असलेल्या रणबीरकडे बरीच चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत असतानाच आता त्याने नव्या चित्रपटाच्या कामाचा श्रीगणेशा केला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात एक फ्रेश जोडी आपल्याला बघायला मिळणार आहे.
आणखी वाचा : “लिटील प्रिन्सेस, तुझ्या येण्याने…” उर्मिला मातोंडकरच्या नवऱ्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
अभिनेता रणबीर कपूर आता अभिनेत्री अनन्य पांडे हिच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. अनन्या पांडे ही बॉलिवूडमधील प्रतिभावान आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. नुकतीच ती ‘लायगर’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. तर आता ती रणबीर कपूरबरोबर काम करायला सज्ज झाली आहे.
अनन्याने नुकतीच सोशल मिडियावरून ही बातमी शेअर केली आहे. तिने तिचा आणि रणबीरचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा फोटो शेअर करत तिने रणबीरबरोबर शूटिंगला सुरुवात केली असल्याचे सांगितले. तिने लिहिले, “नवा दिवस, नवीन शूट, माझा सर्वात आवडता अभिनेता, बेस्ट फ्रेंड.” याचबरोबर ‘फ्रेंड अस्त्र’ असा हॅशटॅगही तिने दिला आहे.
हेही वाचा : ‘ब्रह्मास्त्र’ने मोडले ‘हे’ ७ मोठे रेकॉर्ड्स, जाणून घ्या कोणत्या चित्रपटांना टाकले मागे
त्यांच्या चित्रपटाबद्दल त्यांनी अद्याप कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. या बातमीनंतर चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत असून चाहते या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. अभिनेत्रीच्या या पोस्टला आतापर्यंत लाखो लाईक्स मिळाले आहेत आणि हा आकडा वाढत आहे. त्या दोघांना एकत्र स्क्रीनवर पाहण्याची चाहते आतुर झाले असल्याचे अनेकांनी कमेंट करून सांगितले. त्यामुळे या चित्रपटाबद्दल अधिक माहिती मिळण्याची नेटकरी वाट बघत आहेत.