‘मुगल-ए-आजम’ या ६०च्या दशकातील प्रसिद्ध चित्रपटाचे दिग्दर्शक आसिफ यांची मुलगी हिना कौसर हिने अंडरवर्ल्ड डॉन इकबाल मिर्ची याच्याशी लग्न केले होते. हिनाची आई निगार सुल्ताना यासुद्धा जुन्या जमान्यातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. १९७० साली प्रदर्शित झालेल्या ‘होली आई रे’ चित्रपटातून हिनाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर पुढच्याच वर्षी १९७१ साली तिच्या वडिलांचे निधन झाले.
चित्रपटसृष्टीत काही वर्षे काम केल्यानंतर हिना कौसरने १९९१ साली अंडरवर्ल्ड डॉन इकबाल मिर्ची याच्याशी लग्न केले. हिना ही इकबालची दुसरी पत्नी होती. या दोघांनी दुबईत निकाह केला होता. १९९३ साली मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपींमध्ये इकबालचे नावही होते. त्याचे खरे नाव इकबाल मेमन असे आहे. मुंबईतील नळ बाजारात इकबालचे मसाल्याचे दुकान होते. त्यामुळेच त्याचे नाव इकबाल मिर्ची असे पडले होते. १९८०मध्ये त्याने ड्रग तस्करीच्या दुनियेत पाऊल टाकलेले.
वाचा : होणाऱ्या नवऱ्याने दिलेली अंगठी अनुष्काने हरवली?
मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यात इकबालचे नाव आल्यानंतर त्याने भारतातून पळ काढला. त्यानंतर हिनानेखील हा देश सोडला. हे दोघे तेव्हा लंडनला पळून गेल्याचे म्हटले जाते. नारकोटिक्स डिपार्टमेंटद्वारे मुंबईत इकबालच्या दोन फ्लॅट्सना सील करण्यात आल्यानंतर त्यांना विरोध करण्यासाठी हिनाने न्यायालयाची पायरी चढली होती. त्यावेळी हिना अखेरची चर्चेत आली. मात्र, तिची याचिका तेव्हा न्यायालयाने फेटाळली होती.
वाचा : अमेय वाघ- साजिरी देशपांडेच्या लग्नाचे फोटो
२०१३ साली इकबाल मिर्चीचा हृयदविकाराने मृत्यू झाल. त्यानंतर हिनाबद्दल कोणतीच बातमी आली नाही. पण, पनामा पेपर लीकप्रकरणी इकबालचे मुलगे आणि पत्नीचे नाव आले होते. मात्र यात हिनाचे नाव नव्हते.