दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा गेल्या काही दिवसांपासून तिच्या आणि पती नागा चैतन्यच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. घटस्फोटानंतर ते पहिल्यांदा एकमेकांसमोर आले आहेत. समांथा आणि नागा चैतन्य रामानायडू स्टुडिओमध्ये शूट करत होते. यावेळी सेटवर जात असताना ते समोरा समोर आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या आठवड्यात समांथा आणि नागा चैतन्य त्यांच्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी हैद्राबादमधील रामानायडु स्टुडिओमध्ये पोहोचले होते. समांथा इथे ‘यशोधा’ या तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी पोहोचली होती. तर नागा चैतन्य त्याच्या वडिलांसोबत असलेल्या ‘बंगाराजू’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी पोहोचला होता.

आणखी वाचा : प्रियांकाला ‘या’ हॉलिवूड अभिनेत्यासोबत करायचेय लग्न

रिपोर्ट नुसार, समांथा आणि नागा चैतन्यने एकमेकांकडे पाहिले सुद्धा नाही. एवढचं काय तर त्या दोघांनी त्यांच्या टीमला देखील लक्ष ठेवायला सांगितले होते. जेणे करून ते दोघं समोरा-समोर येणार नाही. त्यांच काम संपल्यानंतर ते लगेच तेथून निघाले.

आणखी वाचा : “कोण अक्षय कुमार…”, लग्नाची भविष्यवाणी ऐकल्यावर ट्विंकल खन्ना पडली होती गोंधळात

आणखी वाचा : ‘गहराइयां’च्या टीझर पेक्षा दीपिकाचा किस आणि बिकिनी चर्चेत!

दरम्यान, तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर समांथा आणि नागा चैतन्यने २०१७ मध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नाला ४ वर्षे पूर्ण होण्याआधीच ते विभक्त झाले. रिपोर्टनुसार, समांथाला नागा चैतन्यच्या कुटुंबाकडून २०० कोटी रुपये पोटगी म्हणून मिळणार होते. पण तिने त्यांच्याकडून १ रुपया ही घेण्यास नकार दिलाय

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After divorce for the first time samanth and naga chaitanya came face to face dcp