बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांकाने अमेरिकन गायक निक जोनासशी लग्न केले. प्रियांकाने लग्न केल्यानंतर तिच्या सोशल मीडिया हॅण्डलवरुन निक जोनासचे आडनाव लावले होते. प्रियांकाने तिच्या सोशल मीडिया हॅण्डलवरुन जोनास हे तिचे सासरचे आडनाव अचानक वगळले आहे. आता प्रियांका लवकरच घटस्फोट घेणार का अशा चर्चा सुरु झाल्या. घटस्फोटाच्या चर्चांमध्ये प्रियांकाने पहिली पोस्ट शेअर केली आहे.

प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. प्रियांकाने तिचा आगामी हॉलिवूड चित्रपट ‘मॅट्रिक्स ४’ चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. हे पोस्टर शेअर ‘ती आली..रि-एनर्ट’ असे कॅप्शन दिले आहे. या पोस्टरमध्ये प्रियांकाला लूक हा वॉरियर सारखा असून सगळ्यांचे लक्ष वेधत आहे. हा चित्रपट २२ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याच प्रियांकाने सांगितलं आहे.

आणखी वाचा : आमिर ‘या’ अभिनेत्री सोबत करणार तिसरं लग्न?

प्रियांकाच्या या पोस्टवर कमेंट करत बॉलिवूड सेलिब्रिटींनी तिच्या लूकची स्तुती केली आहे. तर नेटकऱ्यांनी ‘तू ठीक आहेस ना? निक कुठे आहे? खरचं तुमचा घटस्फोट झाला का?’ असे अनेक प्रश्न विचारले आहेत. दरम्यान, प्रियांकाने जोनस हे आडनाव सोशल मीडिया हॅण्डलवरुन काढल्यानंतर अनेक नेटकऱ्यांना दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री समांथा रुथ प्रभूची आठवण आली.

आणखी वाचा : प्रियांका आणि निकच्या घटस्फोटाच्या चर्चेनंतर सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव

‘मॅट्रिक्स ४’ या सायन्स फिक्शन चित्रपटाचे दिग्दर्शन, निर्मिती लाना वाचोव्स्की यांनी केले आहे. या चित्रपटात कियानू रीव्ह्स, कॅरी-अॅन मॉस आणि जडा पिंकेट स्मिथ यांनी या चित्रपटातील आधीच्या भागात काम केले आहे. ‘मॅट्रिक्स ४’ मध्ये आता याह्या अब्दुल-मतीन दुसरा, जेसिका हेनविक, जोनाथन ग्रॉफ, नील पॅट्रिक हॅरिस, प्रियंका चोप्रा आणि क्रिस्टीना रिक्की यांच्याही भूमिका पाहायला मिळणार आहेत.

Story img Loader