बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता सोशल मीडियावर काही ना काही कारणाने सतत चर्चेत असतात. त्या बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आणि टॅलेंटेड अभिनेत्रींपैकी एक आहेत. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी आजही या क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान कायम राखलं आहे. नीना गुप्ता त्यांच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखल्या जातात. नुकताच त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नीना गुप्ता यांनी नुकतीच मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये इंडिया आर्ट्स फेस्टिव्हलला भेट दिली. या फेस्टिवलमध्ये लावण्यात आलेय चित्रांची त्यांनी पाहणी केली. त्यांच्यबरोबरीने अनेकजण हा फेस्टिवल बघण्यासाठी आले होते. यातीलच त्यांचा एक चाहता असावा त्याने नीना गुप्ता यांचा फोटो काढला. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली की, “लोक न विचारता फोटो काढतात, मी तर सार्वजनिक मालमत्ता आहे. ठीके काही हरकत नाही.” अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली.

नीना गुप्ता अनेकवर्ष चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. बॉलिवूडमधील एक ज्येष्ठ अभिनेत्री म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते. नुकत्याच ‘वध’च्या चित्रपटात झळकल्या होत्या. त्याआधी अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच ‘उंचाई’ आणि ‘गुडबाय’ या चित्रपटातही झळकल्या होत्या.