कधी काळी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी लोकप्रिय अभिनेत्री माही वीजचा आज वाढदिवस आहे. माही तिचा ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली माही लग्नानंतर छोट्या पडद्यापासून जशी काय लांब झाली. लग्नानंतर तिचे करिअर रातोरात जसे संपूण गेले. अनेक निर्मात्यांनी तिला काम देण्यास नकार दिला.

माहीने २०११ साली अभिनेता जय भानुशालीशी गुपचूप लग्न केले. या दोघांनी लग्न केल्याची बातमी जवळपास एक वर्ष सगळ्यांपासून लपवून ठेवली. लग्नानंतर माही ओव्हरटाईम काम करू शकत नव्हती. कारण तिच्या हातात कुटूंबाची जबाबादारी होती. या सगळ्यामुळे तिने काही काळ अभिनयापासून लांब राहण्याचे ठरवले. जवळपास तीन वर्षांनंतर माहीने ‘बालिका वधू’ या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेतून पुन्हा एकदा एण्ट्री केली. त्यावेळी तिला मुख्य भूमिका देण्यास निर्मात्यांनी नकार दिला. कारण माहीने तीन वर्ष ब्रेक घेतला होतो. त्या तीन वर्षांच्या कालावधीत दुसऱ्या अनेक अभिनेत्री लोकप्रिय झाल्या होत्या. यामुळे माहीला सहाय्यक भूमिका मिळाली. मात्र सतत सहाय्यक भूमिका करणं माहीला काही पटतं नव्हत, त्यामुळे तिने मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आता इतकी वर्षे लोटली तरी माहीने काम केले नाही. सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेली माही आज बेरोजगार आहे.

२००७ साली ‘अकेला’ या मालिकेतून माहीने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. त्यानंतर तिने ‘शुभ कदम’, ‘रिश्तों से बडी प्रथा’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या. तर २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लागी तुझसे लगन’ या मालिकेतून माही प्रकाशझोतात आली होती. या मालिकेत माहीने नकुशा ही भूमिका साकारली होती. या मालिकेती नकुशा आणि दत्ता भाऊ यांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या नंतर माहीने ‘झलक दिखलाजा’, ‘बिग बॉस’, ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ यांसारख्या काही रिअॅलिटी शोमध्ये देखील भाग घेतला आहे.

Story img Loader