अभिनेत्री हेमांगी कवीने सोमवारी (१२ जुलैे २०२१ रोजी) इन्स्ताग्राम व्हिडीओवरील ट्रोलिंगवरुन पोस्ट केलेल्या ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ या पोस्टची मागील काही दिवसांपासून सोशल नेटवर्किंगवर तुफान चर्चा आहे. मात्र असं असतानाच आता अन्य एका अभिनेत्रीने तिला गरोदरपणावरुन ट्रोल करणाऱ्यांना आपल्या इन्स्ताग्राम पोस्टमधून सडेतोड उत्तर दिलं आहे. गरोदरपणातील फोटो पोस्ट केल्यामुळे अनेकांनी कमेंट करुन ट्रोलिंग केल्यानंतर या अभिनेत्रीने या ट्रोलर्सला अगदी खास पोस्ट लिहून उत्तर दिलं आहे. हेमांगीनंतर ट्रोलर्सला टोला लगावणाऱ्या या अभिनेत्रीचं नाव आहे, उर्मिला निंबाळकर.
हिंदी मालिका तसेच मराठी चित्रपटांमधील आपल्या वेगळ्या भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या उर्मिलाने तिला ट्रोल करणाऱ्यांना अगदी संयमी शब्दांमध्ये सुनावलं आहे. उर्मिला लवकरच आई होणार आहे. ती गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आपल्या बेबी बम्पसहीत फोटो पोस्ट करत आहे. उर्मिला ही सोशल नेटवर्किंगवर प्रचंड सक्रीय असून ती या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. अगदी चित्रपटांपासून फॅशनपर्यंत अनेक गोष्टींबद्दल ती सोशल नेटवर्किंगवर व्य्त होत असते. मात्र सध्या तिने गरोदरपणातील काही फोटो पोस्ट केल्यानंतर महिलांकडूनच तिला ट्रोल केलं जात असल्याचं कमेंट सेक्शनमध्ये दिसत आहे. मात्र नुकतीच तिने एक पोस्ट शेअर करत या ट्रोलर्सला उत्तर देत हे फोटो का काढते याबद्दल सांगितलंय.
नक्की वाचा >> करोना, पवार, ठाकरे, फडणवीस… नाही चर्चा ‘बाई, बूब्स आणि ब्रा’चीच; Google ची आकडेवारी एकदा पाहाच
सोशल मीडियावर उर्मिलाला ट्रोल करताना वापरल्या जाणाऱ्या कमेंटमधील मजकूर लिहीत तिने पोस्टला सुरुवात केलीय. “‘आमचं बाळ काय ढगातून पडलंय का?’, ‘एवढं काय हिचं प्रेगन्सीचं कौतुक?’, ‘कोणाला काय पोटं येत नाहीत का?’, मागच्या नऊ महिन्यात या सगळ्या कमेंट्स, मला स्त्रीयांनीच पाठवल्यात स्त्री असून दुसऱ्या स्त्रीच्या आनंदात आणि वेदनेच्या अतिशय सारख्याच प्रवासातही आपण तिला साथ देऊ शकत नाही, ही स्त्री जातीची शोकांतिका आहे,” असा टोला उर्मिलाने पोस्टच्या सुरवातीलाच लगावला आहे. पुढे लिहिताना ती म्हणते, “पण एक स्त्री म्हणून मी इतर स्त्रीयांना सांगेन, जेवढे हे क्षण टिपतां येत असतील, तेवढे टिपून घ्या. या संपुर्ण प्रवासाचा खुप आनंद लूटा. हे सुंदर, जादुई क्षण अतिशय पटकन संपून जातात आणि पुन्हा कधीच परत येत नाहीत. (त्यासाठी डायरेक्ट दुसरं बाळ जन्माला घालावं लागतं) मला तर विश्वासच बसत नाहीय की, माझा नववा महिना सुद्धा संपायला आता काही दिवसंच राहिलेत. आनंद, उत्साह आणि फक्त या दिव्य व्यवस्थेचे निरीक्षण करत मी कृतज्ञता व्यक्त करत आहे.”
नक्की पाहा हे फोटो >> ब्रा ते बुब्स अन् कमोड ते लघुशंका… ट्रोलर्सलाच ट्रोल करणारी, न बोलल्या जाणाऱ्या विषयावर लिहिणारी ‘कवी’
उर्मिलाने संगीत सम्राट या रिअॅलिटी शोमध्ये गायक रोहित राऊत सोबत सूत्रसंचलन केलं आहे. दिया और बातमी हम, मेरी आशिक तुम से ही, एक तारा, दुरेही अशा मालिका आणि चित्रपटांमधून तिच्या अभिनयाची झलक पहायला मिळाली आहे. नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजीमधून पदवीपर्यंतचं शिक्षण उर्मिलाने घेतलं आहे. ९ फेब्रुवारी २०१३ रोजी उर्मिला सुकीर्त गुमस्तेसोबत लग्नबंधनात अडकली. याच वर्षी एक एप्रिल रोजी तिने आपल्या पतीसोबतचे फोटो पोस्ट करत आपण गरोदर असल्याची माहिती दिली होती.
नक्की वाचा >> स्त्री-पुरुष समानता अन् कॉमन टॉयलेटमधील कमोड…; जेव्हा हेमांगी कवीने पुरुषांना सुनावलं होतं
महिला ट्रोलर्सची उर्मिलने फिरकी घेत केलेली ही पोस्ट व्हायरल झाली असून २४ तासांमध्ये या पोस्टला २१ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.