बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर हे लोकप्रिय अभिनेता आहेत. त्यांचा ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. अनुपम खेर यांचा हा चित्रपट प्रमोशनशिवाय थिएटरमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली आहे. चित्रपटाचा प्रत्येक शो हाऊसफुल दिसत आहे. विवेक अग्निहोत्री यांनी काश्मिरी पंडितांवरील अत्याचार आणि त्यांची कहाणी जशीच्या-तशी प्रेक्षकांसमोर मांडली आहे. आता हे सगळं पाहता अनेक प्रेक्षक हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी प्रदर्शित होणार आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असे अनेक प्रेक्षक विचारत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर, हा चित्रपट लवकरच Zee5 या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची घोषणा अद्याप झालेली नाही. जर तुम्ही अंदाज लावलात तर साधारण महिनाभरात तुम्हाला हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट पाहायला मिळू शकतो.

आणखी वाचा : आराध्या हिंदी भाषेवरील प्रभुत्व पाहून अभिषेक बच्चनने जोडले हात, पाहा Video

आणखी वाचा : “प्रसिद्ध व्यावसायिकाने मला त्याच्या पत्नीसोबत रात्र…”, तेहसीन पुनावालाने केला धक्कादायक खुलासा

चित्रपटात रवी खन्ना यांचे आक्षेपार्ह चित्रण केल्याचे सांगण्यात आले. स्क्वॉड्रन लिडर रवि खन्ना हे २५ जानेवारी १९९० मध्ये श्रीनगर येथे झालेल्या हल्ल्यात शहीद झाले होते. या घटनेमध्ये वायुसेनेचे चार अधिकारी शहीद झाले होते. हा हल्ला जम्मु काश्मीर येथील लिब्रेशन फ्रंटचे प्रमुख यासीन मलिक यांनी केला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे. या चित्रपटात अनुपम खेर यांच्यासोबत मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पुनीत इस्सार, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वीराज सरनाईक कलाकार आहेत.