वर्षांच्या सुरुवातीलाच सलमानचा ज्या पध्दतीने तिकीटबारीवर ‘जय हो’ शिरकाण झाले ते पाहिल्यानंतर आता येणाऱ्या प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत जे जे उत्तम असे निवडून निवडून काम करण्याचे तंत्र त्याने अवलंबले आहे. त्याचा दुसरा चित्रपट ‘किक’ ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असून या चित्रपटाने काहीही करून गल्ला जमवणे भाईच्या कारकिर्दीसाठी आवश्यक बनले आहे. आणि त्याच्यासाठी ही जबाबदारी त्याचा मित्र ‘किक’चा निर्माता-दिग्दर्शक साजिद नाडियादवालाने उचलली आहे. या चित्रपटात त्याने सलमानला सुपरहिरो म्हणून भूमिका दिली आहे का हे माहीत नाही. पण, चित्रपटाच्या पहिल्याच पोस्टरवर भाईसाठी अगदी ह्रतिकच्या ‘क्रिश’ सारखा मुखवटा दिला आहे.
‘किक’ हा सलमानसाठी खास अॅक्शनपट बनवण्यात आला आहे. या चित्रपटातील अॅक्शनदृश्यांसाठी खास हॉलिवूडच्या अॅक्शन दिग्दर्शकांना पाचारण करण्यात आले आहे, वगैरे सगळे ठीक आहे. मात्र, सलमान या चित्रपटात एवढी अॅक्शन का करणार आहे, त्याची नेमकी भूमिका काय असणार आहे, या सगळ्या गोष्टी गुलदस्त्यात ठेवण्यात आल्या आहेत. ‘किक’ हा २००९ सालच्या तेलुगू चित्रपटाचा रिमेक आहे. मात्र, खास सलमानसाठी या चित्रपटाची पटकथा प्रसिध्द लेखक चेतन भगतकडून लिहून घेण्यात आली आहे. पण, या चित्रपटाच्या पोस्टरसाठी काहीतरी वेगळे करणे आवश्यक होते. ‘किक’चे पहिले पोस्टर सलमानची या चित्रपटासाठी वेगळी ओळख निर्माण करून देणारे असायला हवे, यासाठी साजिद नाडियादवालाही आग्रही होता. त्यामुळेच या पोस्टरमध्ये एक मुखवटा दाखवण्यात आला आहे.
‘किक’च्या पोस्टरमध्ये झळकलेला मुखवटा हा ह्रतिक रोशनच्या ‘क्रिश’ चित्रपटातील मुखवटय़ाशी साधम्र्य असणारा आहे. त्यामुळे या चित्रपटातून सलमानही सुपरहिरो साकारणार असे साजिदला सुचवायचे आहे को, याचीही चर्चा होते आहे. रूपेरी पडद्यावर सलमान सुपरहिरो म्हणून झळकला नाही तरी पडद्यामागची त्याची सुपरहिरोगिरी नित्यनेमाने सुरू आहे. ‘किक’साठी लिहिलेले संवाद सलमानला इतके आवडले आहेत की त्याने या चित्रपटाचा संवाद लेखक रजत अरोराला आपले महागडे मनगटी घडय़ाळ भेट म्हणून दिले आहेच. शिवाय, जो निर्माता-दिग्दर्शक भेटेल त्याला तो रजतचे नाव सुचवतो आहे. बॉलिवूडमध्ये आपल्या मुलांना एक तरी चित्रपट मिळावा म्हणून धडपडणाऱ्यांची रांग त्याच्या घरासमोर लागलेली आहेच. यातून त्याने आणखी एक नवीन नाव निवडले आहे ते म्हणजे त्याची ‘मैने प्यार किया’ चित्रपटातील नायिका भाग्यश्रीच्या मुलाचे. तिचा मुलगा अभिमन्यूलाही चित्रपट मिळवून देण्याचा विडा त्याने उचलला आहे. त्यामुळे पडद्यावर नसला तरी पडद्यामागे सध्या तोच कलाकारांचा आणि सामान्य प्रेक्षकांचाही सुपरहिरो आहे.
ह्रतिकपाठोपाठ सलमानही सुपरहिरो?
वर्षांच्या सुरुवातीलाच सलमानचा ज्या पध्दतीने तिकीटबारीवर ‘जय हो’ शिरकाण झाले ते पाहिल्यानंतर आता येणाऱ्या प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत जे जे उत्तम असे निवडून निवडून काम करण्याचे तंत्र त्याने अवलंबले आहे.
First published on: 13-06-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After hrithik and salman turns superhero