रजनीकांत या नावाची जादू आपण सध्या बॉक्स ऑफिसवर अनुभवत आहोत. सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘जेलर’ हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाने जवळपास ६०० कोटींची कमाई केली आहे. रजनीकांत यांचे सगळेच चाहते याचा आनंद साजरा करत आहेत. प्रेक्षकांनी या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. आता नुकतंच रजनीकांत यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्या बस डेपोमध्ये त्यांनी कंडक्टर म्हणून काम केलं तिथे त्या डेपोला त्यांनी नुकतीच भेट दिली आहे.

नुकतंच BMTC म्हणजेच Bengaluru Metropolitan Transport Corporation या बस डेपोमध्ये रजनीकांत यांनी हजेरी लावली. तिथे काम करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याला याबद्दल जराही कल्पना नव्हती. रजनीकांत यांच्या या सरप्राइज भेटीमुळे सगळेच भारावून गेले. रजनीकांत यांनी चित्रपटात येण्याआधी बऱ्याच ठिकाणी पडेल ते काम केलं. कुली म्हणून तसेच तांदळाची पोती उचलण्याचं कामही त्यांनी केलं.

inspection of TMT drivers List of instructions for drivers thane news
टीएमटी चालकांची सकाळ संध्याकाळ तपासणी;  चालकांसाठी सुचनांची यादी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
epileptic attack, youth epileptic attack, Pune,
पुणे : अपघातानंतर तरुणाला अपस्माराचा झटका, पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरेंच्या तत्परतेमुळे वैद्यकीय मदत
Titeeksha Tawde
Video: मालिका संपल्यानंतर कलाकार पुन्हा आले एकत्र; तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ, नेटकरी म्हणाले…
tejashri pradhan shares post about her hashtag tadev lagnam marathi movie not enough screens
सिनेमा हाऊसफुल, तरीही थिएटर नाहीत…; तेजश्री प्रधानची खंत! ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ चित्रपटासाठी पोस्ट करत म्हणाली…
Kedar shinde suraj Chavan jhapuk jhupuk movie muhurta photos viral
केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा मुहूर्त पार पडला, सूरज चव्हाणसह मालिकाविश्वातील ‘हे’ लोकप्रिय चेहरे झळकणार
Image Of Supriya Sule.
Supriya Sule : “मी मुख्यमंत्र्यांची विरोधक आहेच पण…”, बीड आणि परभणी प्रकरणी सुप्रिया सुळेंचे फडणवीसांना आवाहन

आणखी वाचा : ‘गदर’साठी सनी देओल नव्हे तर गोविंदा होता दिग्दर्शकाची पसंती? अनिल शर्मा यांनी सांगितलं नेमकं सत्य

यानंतर त्यांनी ‘बंगलोर ट्रान्सपोर्ट सर्विस’मध्ये कंडक्टरची नोकरीही केली. नुकतंच त्यांनी या डेपोच्या परिसरात कोणालाच काही कल्पना न देता हजेरी लावली. बस ड्रायव्हर तसेच कंडक्टर यांच्याशी त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या अन् इतर सहकाऱ्यांसह फोटोसुद्धा काढले. रजनीकांत यांना बस डेपोमध्ये पाहून इतरही लोकांनी तिथे तुडुंब गर्दी केली. रजनीकांत यांनी प्रत्येकाशी संवाद साधला अन् सगळ्यांबरोबर फोटोही काढले.

मराठी कुटुंबात जन्मलेल्या रजनीकांत यांनी साऱ्या जगाला स्वतःच्या अभिनयाची दखल घ्यायला लावली. रजनीकांत जेव्हा कंडक्टरची नोकरी करत होते तेव्हा त्यांच्या एका सहकारी बस ड्रायव्हरने त्यांना अभिनयात नशीब अजमावण्यासाठी प्रेरित केलं. राज बहादूर हे त्या बस ड्रायव्हरचं नाव होतं आणि त्यांच्यामुळेच रजनीकांत यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास सुरू झाला.

Story img Loader