चित्रपटसृष्टीचा सर्वात मोठा सुपरस्टार म्हणजेच रजनीकांत यांनी नुकताच ‘जेलर’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. चित्रपटाने जबरदस्त कमाई केली शिवाय रजनीकांत यांची जादू ही आजही कायम आहे हे पुन्हा सिद्ध झालं. यानंतर रजनीकांत हिमालयात निघून गेल्याचं समोर आलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता मात्र रजनीकांत पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच जाहीर झाली आहे. या चित्रपटात रजनीकांत यांना पुन्हा मुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

आणखी वाचा : आपल्या चाहतीला बादशाहने स्वतःकडची ‘ही’ महागडी वस्तू दिली भेट; रॅपरची कृती ठरली कौतुकास्पद

‘लायका प्रोडक्शन’ने केलेल्या ट्वीटमध्ये ‘लाल सलाम’ या आगामी रजनीकांत यांच्या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. २०२४ मधील पोंगलच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ही बातमी देताना चित्रपटाचं एक नवं पोस्टरदेखील शेयर करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये रजनीकांत यांचा पुन्हा एकदा डॅशिंग अवतार पाहायला मिळत आहे.

या चित्रपटात रजनीकांत यांच्यासह विष्णु विशाल आणि विक्रांत यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. रजनीकांत यांची कन्या ऐश्वर्या या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे. तब्बल ८ वर्षांनी ऐश्वर्या पुन्हा एकदा दिग्दर्शक म्हणून पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचं संगीत ए आर रहमान यांचं असणार आहे. ‘जेलर’च्या जबरदस्त कमाईनंतर रजनीकांत हे पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यास सज्ज झाले आहेत.