बॉलिवूड अभिनेता परेश रावल हे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या सगळ्यांचे मनोरंजन करत आहेत. परेश रावल यांनी आजवर एका खलनायकाच्या भूमिकेपासून ते कॉमेडीयनच्या भूमिकेपर्यंत अनेक भूमिका साकारल्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा ‘हंगामा २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता त्या पाठोपाठ आणखी एक चित्रपट घेऊन ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. लवकरच ते उमेश शुक्ला दिग्दर्शित ‘आंख मिचोली’ या चित्रपट प्रमूख भूमिका साकारतान दिसणार आहेत.

‘आंख मिचोली’ या चित्रपटाची घोषणा गेल्या वर्षी करण्यात आली होती. आता या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. नुकताच परेश रावल यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर ट्वीट करत पोस्टर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करत त्यांनी, “ही चीटिंग नाही सेटिंग आहे. हे आहे माझ्या आगामी चित्रपटाचे पोस्टर.. चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येईल” या आशयाचे कॅप्शन दिले आहे. हा चित्रपट वर्षा अखेरीस प्रदर्शित होणार असल्याचे देखील त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

आंख मिचोली’ चित्रपटाच्या पोस्टरवर एक मोठा चष्मा दाखवण्यात आला आहे. या चष्म्याच्या एका बाजूला दिवस आणि दुसऱ्या बाजूला रात्र दाखवण्यात आली आहे. पोस्टर पाहून नेटकाऱ्यांना चित्रपटात नेमके काय पाहायला मिळणार? असा प्रश्न पडला आहे.

परेश रावल यांच्या सोबत ‘आंख मिचोली’ या चित्रपटात शर्मन जोशी, दिव्य दत्त , मृणाल ठाकूर हे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान परेश रावल आणि मृणाल ठाकूर याआधी ‘तुफान’ या चित्रपटमध्ये देखील एकत्र झळकले होते. आता पुन्हा मृणाल ठाकूर आणि परेश रावल यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.