साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांचा आगामी चित्रपट ‘जेलर’ चांगलाच चर्चेत आहे. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार हा चित्रपट पूर्ण केल्यानंतर रजनीकांत काही काळ शांततेसाठी हिमालयात आध्यात्मिक प्रवासाला जाणार आहेत. मीडिया रीपोर्टनुसार ‘जेलर’शी संबंधित सर्व काम पूर्ण केल्यानंतर रजनीकांत पुन्हा एकदा ६ किंवा ७ ऑगस्ट रोजी त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करणार आहेत.

रजनीकांत यांचं अध्यात्माशी फार जुनं आणि अतुट असं नातं आहे. प्रत्येक चित्रपट झाल्यानंतर रजनीकांत हिमालयात मनशांतीसाठी जातात. मात्र २०१० मध्ये काही वैद्यकीय कारणांमुळे त्यांना हिमालयात जायची ही परंपरा थांबवावी लागली होती. २०१८ मध्ये त्यांनी ‘काला’ व ‘२.०’ या चित्रपटानंतर आपल्या आध्यात्मिक प्रवासाला पुन्हा सुरुवात केली.

The Origin of the Honeymoon Tradition
सफरनामा : मधु इथे अन्…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Ranveer Allahbadiya
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…
devotees crowd in pandharpur due to christmas holidays
नाताळ सुटीमुळे पंढरपूरला भाविकांची गर्दी
lonar lake flamingos marathi news
Video : ‘फ्लेमिंगो’ला आवडले लोणार सरोवर
tharla tar mag can arjun sayali meets again madhubhau took strict decision
ठरलं तर मग : सायली-अर्जुनचं नातं कायमचं तुटणार? मधुभाऊंनी लेकीकडून घेतलं ‘हे’ वचन, तर दारात आलेला अर्जुन…; पाहा प्रोमो
Pankaj Tripathi
पंकज त्रिपाठी दशावतार लोककला कोकणातल्या ‘या’ गावी शिकले; अनुभव सांगत म्हणाले, “मुंबईत येण्याआधी नशिबाने…”
Image of PM Modi with Abdullateef Alnesef and Abdullah Baron.
PM Modi Kuwait Visit : पंतप्रधान मोदी यांनी कुवेतमध्ये घेतली महाभारत आणि रामायणाचे अरबीमध्ये भाषांतर करणाऱ्यांची भेट

आणखी वाचा : “मला दारूचं व्यसन नसतं तर…” सुपरस्टार रजनीकांत यांचं वक्तव्य चर्चेत

कोविडमुळे मात्र परत दोन वर्षं यात खंड पडला. आता ‘जेलर’चं काम पूर्ण झाल्यावर पुन्हा आपल्या आपल्या मनःशांतीसाठी रजनीकांत हिमालयात जाणार आहेत. हा जबरदस्त अॅक्शनपट असणार आहे. ‘जेलर’मध्य रजनीकांतसह जैकी श्रॉफ, शिवा राजकुमार, सुनील, तमन्ना भाटिया, राम्या कृष्णन, मिरना मेनन, योगी बाबू आणि विनायकनसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

रजनीकांत यांना फिरायची प्रचंड आवड आहे. काही दिवसांपूर्वीच ते सुट्टी घेऊन मालदीवला फिरायला गेले होते. ‘जेलर’च्या ऑडिओ लॉंचसाठी ते मग पुन्हा चेन्नईला परतले. ‘जेलर’ व्यतिरिक्त, रजनीकांत यांचा आणखी एका चित्रपटाची लोकांना उत्सुकता लागून आहे तो चित्रपट म्हणजे स्पोर्ट्स ड्रामा फिल्म ‘लाल सलाम’. त्यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत या सिनेमाचं दिग्दर्शंन करणार आहे.

Story img Loader