दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कलंक’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये भव्यदिव्य दृश्य आणि डोळे दिपवणारा सेट पाहायला मिळत आहे. जफर आणि रुपची प्रेमकथा आणि त्या प्रेमकथेत येणारे अडथळे या ट्रेलरमध्ये अधोरेखित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या ट्रेलरमध्ये आणखी एका भूमिकेवरुन पडदा उचलण्यात आला असून ही नवी भूमिका अभिनेता कुणाल खेमू साकारणार आहे.  कोणत्याही चित्रपटाचा ट्रेलर किंवा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर एक तर त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव होतो किंवा त्याच्यावर अनेक मीम्स तयार केले जातात. त्याप्रमाणेच कलंकच्या ट्रेलरवरही नेटकऱ्यांनी काही मीम्स तयार केले आहेत. नेटकऱ्यांनी तयार केलेले हे मीम्स भन्नाट असून ते वाचल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही. त्यामुळे चला तर पाहुयात सोशल मीडियावर ‘कलंक’ची खिल्ली उडवणारे काही भन्नाट मीम्स:

धर्मा प्रॉडक्शन्स निर्मित ‘कलंक’ हा चित्रपट १७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असून चित्रपटात आलिया भट्ट, वरुण धवन, संजय दत्त, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर अशी तगडी स्टारकास्ट पहायला मिळणार आहे.

Story img Loader