बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर आणि मलायका अरोराची बहिण अमृता अरोरा या दोघांना करोनाचे संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. त्या दोघी सध्या होम क्वारंटाईन आहेत. शिवाय, ७ दिवसांनी त्यांची पुन्हा एकदा करोना चाचणी करण्यात येणार आहे. दरम्यान, या दोघी ज्या ज्या मजल्यावर राहतात ते मजले सील करण्यात आले आहे. काही दिवसांपासून करीना आणि अमृताने बऱ्याच पार्ट्यांमध्ये हजेरी लावली होती. त्यांच्या संपर्कात ३० लोक आहे होते. त्यांच्याही करोना चाचणी करण्यात आल्या होत्या.
या दोघींनी बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने आयोजित केलेल्या पार्टीमध्ये हजेरी लावली होती. या पार्टीत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्या सेलिब्रिटींचीही करोना चाचणी करण्यात आली होती. त्या सगळ्यांमध्ये निर्माता सोहैल खानची पत्नी सीमा खान आणि अभिनेता संजय कपूर यांची पत्नी महिप कपूर यांना ही करोनाचे संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. ओमिक्रॉन विषाणूमुळे पालिकेने अनेक निर्बंध लावले आहेत. तरी देखील सेलिब्रिटींकडून बऱ्याचवेळा त्या निर्बंधांचे उल्लंघन झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने करण जोहर राहत असलेल्या इमारतीत आणि परिसरात करोना संसर्ग चाचणी आणि स्क्रिनिंग सुरू केली आहे.
आणखी वाचा : ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीवर कतरिनाचा भाऊ फिदा! पोस्ट शेअर करत म्हणाला…
आणखी वाचा : “हिला कसला एवढा अॅटिट्यूड…”, जान्हवीचा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले
दरम्यान, करीना आणि अमृताच्या संपर्कात आलेल्या करिष्मा कपूर, मलायका अरोरा, अनिल कपूर यांची धाकटी लेक रिया यांना घरीच आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगण्यात आले आहे. पहिली पार्टी रिया हिच्या घरी झाली होती. ही पार्टी ख्रिसमस पार्टी होती. त्यानंतर या दोघींनी अनेक खासगी पार्ट्यांना हजेरी लावली होती. त्यातच ग्रँड हयात हॉटेलमधील पार्टीत अनेक सेलिब्रिटींनी गर्दी केल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात सारा अली खान, तिचा भाऊ इब्राहिम अली खान, जान्हवी कपूर आणि सारा तेंडुलकरनेही हजेरी लावली होती.