सलमानची पूर्वाश्रमीची प्रेयसी कतरिना कैफ आणि रणबीर यांच्या स्पेनमधील छायाचित्रांनंतर आता सलमाननेही नंबर लावला आहे. लुलिया वेंतुर ही त्याची नवी प्रेयसी असल्याची चर्चा आहे. लुलिया ही सलमानची केवळ मैत्रिण आहे की त्या दोघांमध्ये काही संबंध आहेत याबाबतची माहिती अद्याप सलमानने दिलेली नाही. परंतु, हे छायाचित्र काही वेगळेच सांगते.
 मेंटल’ चित्रपटाच्या सेटवर ‘बिइंग हयुमन’चे पिवळे टी-शर्ट परिधान केलेली लुलिया सलमानसोबत आढळली होती. सलमानची ही नवीन गर्लफ्रेंड रोमन टीव्ही अभिनेत्री आणि सूत्रसंचालक आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेकवेळा हे दोघेही वांद्रा येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये एकत्र दिसले होते.
यापूर्वी, सलमानचे नाव सोमी अली, संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय आणि कतरिना कैफ यांच्याशी जोडले गेले आहे.

Story img Loader