बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. शाहिद सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. दरम्यान, चाहत्यांशी संपर्क साधण्यासाठी शाहिदने ‘Q & A session’ घेलते होते . यावेळी शाहिदने दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री समांथाची ‘द फॅमिली मॅन २’ मधील भूमिका पाहिल्यानंतर एक इच्छा व्यक्त केली आहे.
शाहिदने ट्विटवर हे ‘Q & A session’ घेलते होते. त्यावेळी एका नेटकऱ्याने त्याला प्रश्न विचारला की “दोन शब्दात ‘द फॅमिली मॅन २’ मध्ये समांथाने साकारलेल्या भूमिके विषयी काय सांगाल.” यावर उत्तर देत शाहिद म्हणाला, “तिला शोमध्ये पाहून आनंद झाला, भविष्यात कधी तिच्या सोबत काम करायला नक्की आवडेल.”
आणखी वाचा : KBC 13 : १५ व्या प्रश्नाचे उत्तर देत सविता ठरणार शोच्या दुसऱ्या करोडपती?
आणखी वाचा : सैफने सांगितले होते अमृताशी घटस्फोट आणि करीनासोबत लग्न करण्याचे खरं कारण
शाहिदचे हे उत्तर ऐकल्यानंतर समांथा आणि शाहिदच्या चाहत्यांना त्या दोघांना एकत्र काम करताना पाहण्याची आतुरता लागली आहे. दरम्यान, शाहिद ‘जर्सी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात शाहिदसोबत मृणाल ठाकूर दिसणार आहे. हा चित्रपट ३१ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार आहे.