सोशल मीडियावर वारंवार चित्रपटांवरून, जाहिरातींवरून, वेब सीरिजवरून वाद सुरु असलेला पाहायला मिळतो. विविध कारणांमुळे अनेक चित्रपटांविरोधात आवाज उठवण्यात आला आहे. सध्या लॉकडाउनमुळे ओटीटी प्लॅटफॉर्म रिलीज होणारे चित्रपट जास्त अडचणीत येताना दिसत आहेत. दरम्यान सध्या अशाच एका सीरिजमुळे नेटफ्लिक्सला (Netflix) सोशल मीडियावरच्या रोषाचा सामना करावा लागतो आहे. माणसाच्या नऊ भावनांवर आधारित नऊ वेगवेगळ्या कथा मांडणारी ‘नवरस’ ही सिरीज नेटफ्लिक्सवर शुक्रवारी ६ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता रिलीज झाली आणि लगेच ट्विटरवर #BanNetflix ट्रेंड सुरु झाला. नेटफ्लिक्सने आपल्या या सीरिजमधील एका कथेसाठी तामिळ वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीवरून हा वाद पेटला आहे. यावरुन मुस्लिम समाजामध्ये तीव्र नाराजीची भावना आहे. सर्वप्रथम रझा अकादमी या संस्थेने यावर आपली तीव्र नाराजी व्यक्त केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा