बॉलीवूडमधील लक्षवेधी तारे-तारकांची मोट बांधण्यात दिग्दर्शक होमी अदजानीया यशस्वी झाले आहेत. त्यांच्या आगामी ‘फाइडिंग फेनी’ या विनोदी इंग्रजी चित्रपटात नसरूद्दीन शहा, डिंपल कपाडिया, बोमन इरानी, दीपिका पदुकोन आणि अर्जुन रामपाल एकत्र येणार आहेत. “या चित्रपटाची पाश्वभूमी, लोकांना विसर पडलेल्या गोव्यातील एका खेड्यातील आहे. ही एक विनोदी कथा आहे. गोव्यातील एका खेड्यातील ग्रामस्त पाच विचित्र व्यक्तींना स्टेफनी फर्नांडीस(फेनी) नावाच्या एका स्त्रीच्या शोधार्थ पाठवतात, परंतू वास्तवात कोणालाच ही फेनी जीवंत आहे का मेली आहे किंवा ती एखाद्याच्या मनाचा भ्रंम आहे का, याबद्दल माहित नसते. ही एक विचित्र, विषण्ण परंतू विनोदी कथा आहे”, असं अदजानीया म्हणाले.
अदजानीयांचा हा तिसरा चित्रपट आहे. याआगोदर त्यांनी सैफ अली खान आणि डिंपल कपाडियालासोबत घेऊन २००६ मध्ये ‘बिईंग सायरस’ या इंग्रजी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. अलिकडेच त्यांचा ‘कॉकटेल’ हा चित्रपट गाजला होता. सध्या अदजानीया ‘फाइंडिंग फेनी’ च्या पटकथेवर काम करत आहेत. या चित्रपटाची निर्मिती सैफ आणि दिनेश विजानच्या इल्यूमिनटी फिल्मसने केली आहे.

Story img Loader