अमिताभ बच्चन यांनी देशातून पोलिओचे उच्चाटन करण्यासाठीच्या संयुक्त राष्ट्राच्या पोलिओ मोहिमेत मोलाचे योगदान दिले आहे. आता अमिताभ यांनी स्त्रियांच्या उद्धारासाठीच्या कामावर लक्ष केंद्रित केले आहे. खुद्द अमिताभ बच्चन यांनीच आपली ही मनिषा बोलून दाखवली आहे. ७१ वर्षीय अमिताभ आता संयुक्त राष्ट्राच्या स्त्री बालक मोहिमेचे राजदूत म्हणून काम करणार आहेत. पोलिओच्या समूळ उच्चाटनासाठी केलेल्या मोहिमेला मिळालेल्या यशाप्रमाणेच यालासुद्धा यश मिळण्याची आशा त्यांनी व्यक्त केली. देशातून पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या मोहिमेचे राजदूत झाल्यावर अमिताभ बच्चन गेली अनेक वर्षे पोलिओ लस देण्यासाठी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागृती निर्माण करण्यासाठी मेहनत घेत आहेत. त्यांच्या या मोहिमेचा देशातील पोलिओचे प्रमाण कमी होण्यात खूप मोठा फायदा झाला. २०१४च्या अखेरीस भारत पोलिओ मुक्त होण्याची आशा वाटत असल्याचे सांगत, देशासाठी अती महत्वाच्या असलेल्या या कार्यासाठी योगदान दिल्याचा अभिमानही त्यांनी व्यक्त केला. आता ते संयुक्त राष्ट्राच्या स्त्री बालक मोहिमेचा भाग झाले आहेत. फेसबुकवरील या विषयीच्या संदेशात ते म्हणतात, आता संयुक्त राष्ट्राच्या स्त्री बालक मोहिमेसाठी राजदूत म्हणून काम करताना पोलिओसाठी जे यश मिळाले तसेच यश आम्हाला स्त्रियांसाठीच्या या मोहिमेत देखील मिळण्याची आशा आहे. – स्त्रियांविषयीच्या भेदभावातून देशाला मुक्त करू.
बॉलिवूडमधील या महानायकाची युनिसेफने २००५ साली सदिच्छा राजदूत म्हणून नियुक्ती केली, तेव्हा पासून लोकांमध्ये पोलिओ विषयी जनजागृती करण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी अनेक जाहिराती आणि मोहिमांमध्ये भाग घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा