प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री मसाबा गुप्ता गेल्या काही महिन्यांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मसाबा आणि सत्यदीप मिश्रा यांनी एप्रिल महिन्यात चाहत्यांना गुड न्यूज दिली. लवकरच आई होणार्‍या मसाबाने तीन महिन्यानंतर पहिल्यांदाच सोशल मीडियावर बेबी बंपचे फोटो शेअर केले आहेत.

मसाबाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मसाबाने काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिचा बेबी बंप दिसतोय. या फोटोंमध्ये मसाबाने काळ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस घातला आहे. ‘मिरर सेल्फी’ घेत मसाबाने हे फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत मसाबा तिच्या पतीसह समुद्रकिनाजवळ क्वालिटी टाईम घालवताना दिसत आहेत.

Masaba Gupta baby girl name is Matara
३ महिन्यांची झाली लेक, बॉलीवूड अभिनेत्रीने नाव केलं जाहीर; ‘मतारा’चा अर्थ काय? वाचा…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
tharla tar mag asmita aka monika dabade baby shower ceremony first look
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळेजेवण, अस्मिता खऱ्या आयुष्यात आई होणार, समोर आला पहिला फोटो
Ruhi Chaturvedi blessed with baby girl
एकाच मालिकेतील तिसरी अभिनेत्री झाली आई, तिघींच्याही घरी मुलींचा जन्म, पोस्ट शेअर करून दिली आनंदाची बातमी
Ankita Walawalkar New Car
अखेर अंकिताच्या घरी ‘ती’ आलीच! ‘कोकण हार्टेड गर्ल’ने घेतली आलिशान गाडी, होणाऱ्या नवऱ्यासह शेअर केला फोटो
premachi goshta after tejashri pradhan exit now this actress will play mukta role
तेजश्री प्रधानने मालिका सोडल्यावर ‘प्रेमाची गोष्ट’च्या सेटवर आली नवीन ‘मुक्ता’! शेअर केला स्क्रिप्टचा पहिला फोटो…
ananya pandey marriage plans
अनन्या पांडे ‘या’ व्यक्तीला करतेय डेट? अभिनेत्री लग्नाचे प्लॅन्स शेअर करत म्हणाली, “पुढील पाच वर्षांत…”
marathi actress Ashwini Chavare bold photos
ओले केस अन् गळ्यात फक्त नेकलेस, मराठी अभिनेत्रीचे बोल्ड फोटो पाहिलेत का?

हेही वाचा… “माझ्या अंगावरचे डाग…”, कर्करोगाशी सामना करणाऱ्या हिना खानचा चाहत्यांना प्रश्न, म्हणाली…

“सगळ्यात चांगली गोष्ट तर अजून व्हायची बाकी आहे. मी खोटं बोलणार नाही, पण हे सगळं मला अजूनही थोडं स्वप्नासारखं वाटतंय.” असं कॅप्शन मसाबाने या फोटोंना दिलं आहे. मसाबाचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटो व्हायरल होताच अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री सुकन्या मोने यांनी कमेंट करत “तुझं मनापासून अभिनंदन” असं लिहिलं. तर “खूप सुंदर दिसतेयस” अशी कमेंट सारा तेंडूलकरने केली आहे.

हेही वाचा… अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात २६ वर्षांपूर्वीच्या गाण्यावर ओरीसह थिरकल्या अनन्या पांडे आणि सारा अली खान, व्हिडीओ चर्चेत

१८ एप्रिल २०२४ रोजी मसाबा आणि सत्यदीप मिश्राने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत दोघं लवकरच आई-बाबा होणार असल्याची बातमी जाहीर केली.

हेही वाचा… “हिंदी म्हणजे आयुष्यात आलेली…”, ‘मॅडनेस मचाएंगे’ बंद होण्याच्या दोन दिवसाआधी कुशल बद्रिकेने शेअर केली खास पोस्ट, म्हणाला…

दरम्यान, मसाबा गुप्ता आणि सत्यदीप मिश्रा यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचं झालं तर, मसाबा गुप्ताचं पहिलं लग्न निर्माते मधु मंतेना यांच्याशी झालं होतं. २०१५ मध्ये त्यांचं लग्न झालं आणि २०१९ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. तर सत्यदीप मिश्राचंही हे दुसरं लग्न आहे. सत्यदीप मिश्राचं आणि अभिनेत्री अदिती राव हैदरी यांचं लग्न झाल्याची बातमी समोर आली होती. तथापि, त्या दोघांनी कधीही वैवाहिक स्थितीबद्दल भाष्य केलं नाही. २०१३ मध्ये अदितीने खुलासा केला होता की ते दोघं वेगळे झाले आहेत.

Story img Loader