प्रियांका चोप्रा, सन्नी लिओननंतर आता व्हिजे आणि अभिनेत्री सोफी चौधरी संजय गुप्ताच्या ‘शूटआऊट अॅट वडाळा’ मध्ये आयटम सॉंग करणार आहे.
मागील आठवड्यापर्यंत प्रियांका चोप्रा आणि सन्नी लिओन यांची नावे चर्चेत होती. मात्र, आता या यादीत सोफी चौधरीचेही नाव समाविष्ट झाले आहे.
‘आला रे आला’, असे या गाण्य़ाचे बोल असून नुकतेच त्याचे फिल्मसिटीमध्ये चित्रिकरण करण्यात आले. हे गाणं माझ्यावर आणि जॉन अब्राहमवर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्याची पार्श्वभूमी मी आत्ताच सांगू शकत नसले तरी, जॉनने मिळवलेल्या यशाचं (चित्रपटातील कथेत) सेलिब्रेशन यामध्ये दाखवण्यात आलं असून चित्रपटातील अत्यंत महत्वाच्या वळणावर हे गाणं आहे. ह्या गाण्याचे नृत्यादिग्दर्शन अहमद खान यांनी केलं असून, अन्नू मलिक यांनी संगीत दिलं आहे, असं सोफी म्हणाली.
सोफीला तिच्या भविष्यातील प्रोजेक्टबदद्ल विचारले असता ती म्हणाली, ज्या दिग्दर्शकाचं काम लोकांना अतिशय आवडलेलं आहे अशा एका दिग्दर्शकासोबत सध्या मी काम करत आहे. याव्यतिरिक्त मी काहिच सागू शकत नाही.
‘शूटआऊट अॅट वडाळा’ हा २००७ साली आलेल्या ‘शूटआऊट अॅट लोखंडवाला’ या चित्रपटाचा पुढील भाग असून हा चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. मुंबई पोलिसांनी १९८२ साली वडाळा येथे केलेल्या पहिल्या एन्काऊंटरची कहाणी या चित्रपटात दाखवण्यात आलेली असून गॅंगस्टर सुर्वेच्या जीवनावर तो आधारीत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा